Poland Moosa : 6 कोटींची बेंटले घ्यायला उद्योजकाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, सोबत अलिशान गाड्यांचा ताफा, कोण आहे पोलंड मूसा?
Poland Moosa Bentley : उद्योजक पोलंड मूसा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर होत आहे. ज्यात तो हेलिकॉप्टरमधून एंट्री घेत असल्याचं पाहायला मिळतं.

Poland Moosa Bentley Bentayga नवी दिल्ली : भारतात गेल्या काही दशकांमध्ये अतिश्रीमंत उद्योजकांची संख्या वाढली आहे. काही उद्योजक भारतात वास्तव्यास आहेत तर काही जणांनी काम आणि उद्योगासाठी विदेशात जाणं पसंत केलं. भारतातील मोठ्या उद्योजकांकडे अनेक अलिशान आणि महागड्या कार आहेत. त्यासंदर्भातील माहिती त्यांच्याकडून देण्यात देखील येते. सध्या अनेक जण कार खरेदी केल्यानंतर ती घ्यायला जात असताना तो अनुभव अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न उद्योजक पोलंड मूसा यानं केला आहे. त्यानं बेंटले ही अलिशान कार घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेतली. याशिवाय इतर महागड्या गाड्यांचा ताफा देखील होता. हा व्हिडिओ पोलंड मूसाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
पोलंड मूसा ऊर्फ मूसा हाजी हा फ्रॅगरन्स वर्ल्ड या कंपनीचा मालक असून ही कंपनी केरळमधील मलप्पुरम मध्ये आहे. पुरुष आणि महिलांसाठी महागडे परफ्यूम निर्मिती या कंपनीकडून केली जाते. पोलंड मूसा यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन बेंटले कंपनीची कार घ्यायला पोहोचतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पोलंड मूसा यांचं हेलिकॉप्टर मलप्पुरममधील एका महालावरुन जात असल्याचं पाहायला मिळतं. पोलंड मूसा जेव्हा हेलिकॉप्टरमधून उतरतात त्यावेळी तीन इतर अलिशान कार तिथं पाहायला मिळतं. रेंज रोव्हर, लँड रोव्हर डिफेंडर 110 आणि टोयोटा लँड क्रूझर या गाड्यांचा ताफा व्हिडिओत पाहायला मिळतो.
मलप्पुरममधील एका खुल्या मैदानात हेलिकॉप्टर लँड होत असताना पाहायला मिळतं. त्यानंतर बेंटले बेंटायगा वर निळं कव्हर टाकलेलं असतं. पोलंड मूसा आणि इतर लोक चालत त्या कारकडे जातात. जे तेव्हा कार जवळ पोहोचतात तेव्हा तो निळा कव्हर काढून टाकला जातो.
पोलंड मूसा यांनी खरेदी केलेली बेंटले बेंटायगाचं नवं ईडब्ल्यूबी व्हर्जन आहे. या गाडीचा रंग रोझ गोल्ड शेडचा असून ते बेंटले बेंटयगाचं सिग्नेचर एडिशन आहे. भारतातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये हा ब्रँड लोकप्रिय आहे.
पोलंड मूसा त्यानंतर हेलिकॉप्टर ऐवजी नव्या कारमधून घरी जाताना पाहायला मिळतो. त्यासोबत इतर अलिशान कारचा ताफा देखील असल्याचं पाहायला मिळालं.
बेंटले बेंटयगा कारला V8 पेट्रोल इंजिन आहे. या कारची किंमत 6 कोटी रुपये इतकी आहे. ही कार रोल्स रॉयस, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज मेबॅक यांच्या काही ब्रँड्सची स्पर्धक कार आहे.
























