Petrol vs Electric Bike : पेट्रोल की इलेक्ट्रिक? तुमच्यासाठी कोणती बाईक आहे बेस्ट? जाणून घ्या
Petrol vs Electric Bike : पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिक बाईक यामध्ये नेमका कोणता फरक आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Petrol vs Electric Bike : गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहन (Electric Bike) विकत घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी ही बाईक परवडत नसल्याने अनेक ग्राहक इलेक्ट्रिक बाईक खरेदी करताना टाळाटाळ करतात. इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या सेगमेंटमध्ये बाजारात अनेक नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आली आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर्ससोबतच कंपन्या आता इलेक्ट्रिक बाईक्सचे नवीन मॉडेल्सही लॉन्च करत आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटची उपलब्ध असणारी ही वाहनेही देशात मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. त्यामुळे नवीन बाईक विकत घेणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल बाईक (Petrol Bike) घ्यावी की इलेक्ट्रिक बाईक घ्यावी हा प्रश्न पडणं साहजिक आहे. या ठिकाणी तुमच्या याच प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत.
या ठिकाणी पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिक बाईक यामध्ये नेमका कोणता फरक आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला बाईक खरेदी करताना अडचण येणार नाही.
किंमत किती?
खरंतर, भारतीय ग्राहकांना कोणतीही बाईक विकत घेताना पहिला प्रश्न पडतो तो किंमतीचा. पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिक बाईक या दोन्हींच्या किंमतीत फार फरक आहे. कारण इलेक्ट्रिक बाईकमध्ये पॉवरसाठी लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरले जातात, ज्याची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे या बाईक पेट्रोल बाईकच्या तुलनेने थोड्या जास्तच असतात.
बाईकचा मायलेज आणि रेंज?
पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकमध्ये 1 लीटर पेट्रोलवर बाईकने कापलेले अंतर कळते. तर, इलेक्ट्रिक बाईकमध्ये एका चार्जवर कापलेल्या एकूण अंतराला रेंज म्हणतात. मात्र, या बाईकना चार्जिंगसाठी सध्या देशात मजबूत पायाभूत सुविधा नाहीत.
चार्जिंग पॉइंटची सर्वात मोठी समस्या
भारतामध्ये अजूनही असे ग्राहक आहेत ज्यांना अजूनही इलेक्ट्रिक बाईकपेक्षा पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकवर विश्वास आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीला चार्जिंगची गरज असते. आणि भारतीय ग्राहकांना प्रत्येकवेळी बाईक चार्ज करणं शक्य होत नाही. शिवाय या बाईकच्या चार्जिंगसाठीही फार वेळ लागतो. या विरूद्ध पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकमध्ये देशात कुठेही इंधन भरता येते.
महत्वाच्या बातम्या :