(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 5 Safest Cars in India : ADAS संरक्षण प्रणालीवर आधारित 'या' 5 कार आहेत अतिशय सुरक्षित; वाचा संपूर्ण माहिती
ADAS System : Honda या सेडानच्या हायब्रीड प्रकारात ADAS प्रणाली देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 19.89 लाख रुपये आहे.
ADAS System : बदलत्या टेक्नॉलॉजीसह देशातील लोकांच्या कार खरेदी करण्याच्या पद्धतीत देखील खूप बदल झालेला आहे. यामध्ये आता ग्राहक फक्त कारचा लूकच पाहात नाहीत, तर, त्या कारमधील फिचर्स आणि सुरक्षिततेकडे (Safety) देखील लक्ष देतात. हे पाहता कार कंपन्यांनीही कारमध्ये अनेक फीचर्स दिले आहेत. ज्यामध्ये ADAS हे सिक्युरिटी फिचर खूप वापरले जात आहे. या फिचरसह बाजारात कोणत्या कार उपलब्ध आहेत हे जाणून घ्या.
एमजी अॅस्टर (MG Astor) :
Aster ही देशातील सर्वात परवडणारी कार आहे. ज्यामध्ये ADAS उपलब्ध आहे. ही कार स्टाईल, सुपर, स्मार्ट आणि शार्प अशा चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.22 लाख ते 18.13 लाख रुपये आहे. ADAS सुरक्षा फिचर फक्त कारच्या शार्प प्रकारात उपलब्ध आहे. कंपनी ते पर्यायी म्हणून देते.
ह्युंदाई टक्सन (Hyundai Tucson) :
Hyundai ने आपल्या Tucson प्रीमियम SUV मध्ये ADAS Level-2 सुरक्षा प्रणाली दिली आहे. या कारमध्ये ब्लाइंड-स्पॉट कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन असिस्ट, लीडिंग व्हेईकल डिपार्चर अलर्ट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारच्या फक्त सिग्नेचर व्हेरिएंटमध्ये ADAS देण्यात आले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 30.17 लाख रुपये आहे.
महिंद्रा XUV 700 (Mahindra XUV 700) :
ADAS संरक्षण प्रणाली केवळ Mahindra XUV 700 च्या AX7 L व्हेरिएंटमध्ये प्रदान करण्यात आली आहे. ज्यामध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग, ट्रॅफिक साईन रेकग्निशन, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, हाय बीम असिस्ट यासारख्या अनेक फीचर्स दिसतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.18 लाख ते 24.58 लाख रुपये आहे.
एमजी ग्लोस्टर (MG Gloster) :
MG Gloster कंपनीने ही SUV काही दिवसांपूर्वीच भारतात लॉन्च केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 31.99 लाख ते 40.78 लाख रुपये आहे. ग्लोस्टरमध्ये आढळलेल्या ADAS प्रणालीमध्ये हाय-बीम कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन, लेन-कीप असिस्टन्स, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि फ्रंट कोलिजन वॉर्निंग यांसारखी वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.
होंडा सिटी H:EV (Honda City H:EV) :
होंडा या सेडानच्या हायब्रिड व्हेरिएंटमध्ये ADAS प्रणाली देते. यात रोड डिपार्चर मिटिगेशन, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम, लेन कीप असिस्ट सिस्टीम, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटो हाय बीम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 19.89 लाख रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :