Odysse Vader : ओडीसी इलेक्ट्रिक बाइक डिसेंबरमध्ये भारतात होणार लाँच, किंमत ....
Electric Vehicles. : ओडीसी वेडर या वर्षाच्या अखेरपर्यंत रस्त्यांवर धावणार, किंमत 1.61 लाख रुपये इतकी आहे. डिसेंबरपासून भारतीय बाजारपेठेत ही बाईक उपलब्ध होणार आहे.
Odysse Vader Electric Vehicles : ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स (Odysse Vader electric motorcycle) डिसेंबर 2023 मध्ये भारतात लाँच होणार आहे. ओडीसीला आज इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अर्थात आयसीएटीकडून (ICAT ) प्रमाणन मिळाले आहे. ओडीसीच्या (Odysse) या फ्लॅगशिप बाइकला एआयएस-156 बॅटरी टेस्टिंगसह सर्व चाचण्या पार करण्यासाठी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) कडून आज प्रमाणन मिळाले आहे.
ओडीसी इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1 लाख 61 हजार 574 इतकी आहे. बाइक फायरी रेड, वेनोम ग्रीन, मिस्टी ग्रे, मिडनाइट ब्ल्यू व ग्लॉसी ब्लॅक या 5 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या बाइकच्या डिलिव्हरीला 1 डिसेंबर 2023 पासून सुरूवात होईल. ओडीसी वेडर कंपनीच्या इको-फ्रेण्डली व कार्यक्षम गतीशीलता सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती कटिबद्धतेमधील महत्त्वाचा टप्पा आहे. स्लीक डिझाइन, शक्तिशाली कार्यक्षमता व स्मार्ट वैशिष्ट्यांसह वेडरने देशभरातील इलेक्ट्रिक वेईकलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
ओडीसी वेडरमध्ये 7 इंच अँड्रॉइड डिस्प्ले आहे, जो आयओटी कनेक्टीव्हीटी व ओटीए अपडेट्स देतो. 3000 वॅट्स इलेक्ट्रिक मोटरची शक्ती असलेल्या मोटरबाइकची अव्वल गती प्रतितास 85 किमी आहे आणि प्रतिचार्ज 125 किमी रेंज देते. या अत्याधुनिक मोटरबाइकचे कर्ब वजन 128 किग्रॅ आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस), पुढील बाजूस 240 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 मिमी डिस्क ब्रेक आहे. सुलभ चार्जिंगकरिता कंपनीने आयपी 67 एआयएस 156 प्रमाणित लिथियम-आयन बॅटरीचा समावेश केला आहे, जी 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकते. एआयएस-156 प्रमाणित बॅटरी पॅक तुलना न करता येणाऱ्या फास्ट चार्जिंगची खात्री देतो, ज्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी ही उच्च विश्वसनीय मोटरबाइक आहे.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमिन वोरा म्हणाले, ''ओडीसी वेडरला मिळालेल्या आयसीएटी प्रमाणनामधून आमची उच्चस्तरीय इलेक्ट्रिक वेईकल्स डिलिव्हर करण्याप्रती अविरत कटिबद्धता दिसून येते. एआयएस-156 प्रमाणित बॅटरी पॅक ओडीसी वेडरला वरचढ ठरवते, ज्यामधून फास्ट चार्जिंग क्षमतांची खात्री मिळण्यासह दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक वेईकलची विश्वसनीयता अधिक दृढ होते. आमचा विश्वास आहे की, या प्रमाणनामुळे इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेतील आमचे स्थान अधिक दृढ होईल.'' ही उल्लेखनीय इलेक्ट्रिक मोटरबाइक आता भारतातील कंपनीच्या सर्व डिलरशिप्समध्ये टेस्ट राइड्ससाठी उपलब्ध आहे. तसेच या फ्लॅगशिप बाइकसाठी बुकिंग फ्लिपकार्ट, कंपनीची वेबसाइट व डिलरिशप्स अशा विविध व्यासपीठांवर करता येऊ शकते, ज्यामूधन देशभरातील ग्राहकांना या मोटरबाइकची अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो.
इलेक्ट्रिक मोटरसायकल वेडर (7 इंच अँड्रॉईड डिस्प्ले, आयओटी, चार ड्राइव्ह मोड्स, 18-लीटर्स स्टोरेज जागा, गुगल मॅप नेव्हिगेशन)
इलेक्ट्रिक बाइक ईव्होकिस (चार ड्राइव्ह मोड्स, कीलेस एण्ट्री, अॅण्टी-थेफ्ट लॉक आणि मोटर कट-ऑफ स्विच)
इलेक्ट्रिक स्कूटर हॉक (क्रूझ कंट्रोल व म्युझिक सिस्टम असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर)
ई2गो, ई2गो+, ई 2 गो प्रो व ई२गो ग्रॅफिन (पोर्टेबल बॅटरी, यूएसबी चार्जिंग, डिजिटल स्पीडोमीटर आणि कीलेस एण्ट्री असलेली इलेक्ट्रिक स्कूटर)
इलेक्ट्रिक स्कूटर व्ही 2 आणि व्ही 2+ (वॉटरप्रूफ मोटर, व्यापक बूट स्पेस, ड्युअल बॅटरी आणि एलईडी लाइट्स)
लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी इलेक्ट्रिक स्कूटर ट्रॉट (250 किग्रॅची लोडिंग क्षमता आणि आयओटी)