नवीन Scorpio-N लाँच, व्हॉईस कमांडवर धावणार कार; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2022 Mahindra Scorpio-N: महिंद्राने आपली बहुप्रतिक्षित SUV Scorpio-N भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने नवीन 2022 Mahindra Scorpio-N SUV ची प्रारंभिक किंमत 11.99 लाख रुपये इतकी ठेवली आहे.
2022 Mahindra Scorpio-N: महिंद्राने आपली बहुप्रतिक्षित SUV Scorpio-N भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने नवीन 2022 Mahindra Scorpio-N SUV ची प्रारंभिक किंमत 11.99 लाख रुपये इतकी ठेवली आहे. जी टॉप डिझेल मॉडेलसाठी 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. देशांतर्गत वाहन निर्मात्याने नवीन 2022 Mahindra Scorpio-N SUV ची बुकिंग आणि डिलिव्हरी तपशील जाहीर केले आहे. कंपनीने खुलासा केला आहे की, बुकिंग 'First Come First Serve' तत्त्वावर केली जाईल आणि डिलिव्हरीची तारीख वेगवेगळी असेल. कंपनीने सांगितले आहे की, नवीन स्कॉर्पिओ-एन तसेच स्कॉर्पिओच्या मागील मॉडेलची विक्री सुरू राहील.
कंपनीने नवीन Mahindra Scorpio-N ची बुकिंग सुरू केली आहे. याची बुकिंग ऑनलाइन आणि महिंद्र डीलरशिपवर 30 जुलै सकाळी 11 पासून सुरू होईल. आगामी सणासुदीच्या काळात याची डिलिव्हरी सुरू होईल, असे कंपनीने म्हटले आहे. 'Ad to Cart' फीचर 5 जुलैपासून ऑनलाइन आणि सर्व डीलरशिपवर उपलब्ध होईल. SUV टेस्ट ड्राइव्हसाठी 5 जुलैपासून 30 शहरांमध्ये आणि उर्वरित देशात 15 जुलैपर्यंत उपलब्ध असेल.
5 जुलैपासून या शहरांमध्ये टेस्ट ड्राइव्ह सुरू
नवी एसयूव्ही टेस्ट ड्राइव्ह दिल्ली आणि एनसीआर, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई एमएमआर, अहमदाबाद, पुणे, चेन्नई, लखनौ, चंदीगड, जयपूर, कोलकाता, लुधियाना, इंदूर, जालंधर, गुवाहाटी, भुवनेश्वर, सुरत, रांची, पटना, कोईम्बतूर, वडोदरा, रायपूर, कोचीन, विशाखापट्टणम, नागपूर, भोपाळ, डेहराडून, अमृतसर, जम्मू आणि कानपूरसह निवडक 30 शहरांमध्ये त्याच दिवसापासून सुरुवात होईल. Mahindra Scorpio-N पाच ट्रिम पर्यायांमध्ये उपलब्ध आहे - Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L. भारतीय बाजारपेठेत Mahindra Scorpio-N ची स्पर्धा टाटा हॅरियर (Tata Harrier), Tata Safari, Hyundai Creta आणि Hyundai Alcazar शी होणार आहे.
इंजिन
नवीन Mahindra Scorpio-N मध्ये Amstallion पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 200 PS पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरा पर्याय म्हणजे mHawk डिझेल इंजिन जे 175 PS पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्याय 6-स्पीड मॅन्युअल तसेच स्वयंचलित गिअरबॉक्ससह उपलब्ध आहेत. शिफ्ट-बाय-केबल तंत्रज्ञान वैशिष्ट्यीकृत करणारी ही या सेगमेंटमधील पहिली SUV आहे. यासह ही SUV या सेगमेंटमधील सर्वात कमी CO2 उत्सर्जित करणारी कार आहे.