![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bajaj Pulsar 220F अपडेटड बाईक लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत
New Bajaj Pulsar Sports Bike : दुचाकी उत्पादक बजाज ऑटोने आपल्या स्पोर्ट्स बाईक Pulsar 220F चा अपडेटड व्हर्जन भारतात लॉन्च केला आहे.
![Bajaj Pulsar 220F अपडेटड बाईक लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत New Bajaj Pulsar Sports Bike Bajaj Pulsar 220F Updated Bike Launch Know Price Latest Auto News in Marathi Bajaj Pulsar 220F अपडेटड बाईक लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/26/e24e6fb365bff3d6931d741acc4d861e1679824240370384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
New Bajaj Pulsar Sports Bike : दुचाकी उत्पादक बजाज ऑटोने आपल्या स्पोर्ट्स बाईक Pulsar 220F चा अपडेटड व्हर्जन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपये ठेवली आहे, जी याच्या जुन्या मॉडेलच्या किंमतीपेक्षा 3,000 रुपये जास्त आहे. ही बाईक देशांतर्गत बाजारात TVS Apache RTR 200 4V सारख्या इतर समान बाईकशी स्पर्धा करेल. कंपनीने या बाईकमध्ये काय बदल करण्यात आले आहेत, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
New Bajaj Pulsar Sports Bike : गेल्या वर्षी या बाईकची विक्री कंपनीने केली होती बंद
गेल्या वर्षी एप्रिल-2022 मध्ये बजाजने (Bajaj Bikes) ही बाईक बंद केली होती. पण तिच्या मागणीमुळे कंपनीने यात काही बदल केले आणि बाईक देशांतर्गत बाजारात पुन्हा नव्याने लॉन्च केली. कंपनीने नुकतीच ही बाईक एकाच प्रकारात लॉन्च केली आहे. यासोबतच या बाईकची डिस्पॅचिंगही सुरू झाली आहे. जेणेकरून ते शक्य तितक्या लवकर देशातील सध्याच्या कंपनीच्या डीलरशिपवर उपलब्ध करून देता येईल.
New Bajaj Pulsar Sports Bike : बजाज पल्सर 220F इंजिन आणि पॉवर
कंपनीने बाईकचा जुना लुक कायम ठेवला आहे, ज्यामध्ये क्लिप-ऑन हँडलबार, स्प्लिट सीट आणि मागील बाजूस टू-पीस ग्रॅब रेलचा समावेश आहे. याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, याला 220cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्ट इंजिन मिळते. जे 20bhp ची कमाल पॉवर आणि 18.5 Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. याशिवाय या बाईकचे इंजिन नवीन BS6 फेज-2 RDE नॉर्म्सनुसार अपडेट करण्यात आले आहे.
New Bajaj Pulsar Sports Bike : बजाज पल्सर 220F फीचर्स
या बाईकच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये अॅनालॉग डायल्स, फ्युएल लेव्हल इंडिकेटर, स्पीडोमीटर आणि डिजिटल स्क्रीनसह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. यात सिंगल-चॅनल एबीएससह फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. बाईकमध्ये 17-इंच अलॉयजचा वापर करण्यात आला आहे.
New Bajaj Pulsar Sports Bike : या बाईकशी करेल स्पर्धा
बजाजची अपडेटेड बजाज पल्सर 220F ची स्पर्धा Suzuki Gixxer SF आणि TVS च्या Apache RTR 180 शी होईल.
इतर महत्वाची बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)