Electric Cars : ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांसह MG ZS EV कार लाँच; 'ही' आहेत खास वैशिष्ट्य
Electric Cars : MG ZS 2023 ही इलेक्ट्रिक कार 4 कलर ऑप्शनसह सादर करण्यात आली आहे.

Electric Cars : MG Motors India ने आपली नवीन अपडेटेड इलेक्ट्रिक कार (Electric Cars) ZS 2023 देशांतर्गत बाजारात लॉन्च केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 27.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार ADAS लेव्हल 2 सह सादर करण्यात आली आहे, जी तीन लेव्हल सेन्सिटिव्हिटी (लो, मिडीयम आणि हाय) आणि थ्री लेव्हल वॉर्निंग (हॅप्टिक, ऑडिओ आणि व्हिज्युअल) वर काम करेल. ही कार 8.5 सेकंदात 0 ते 100 कि.मी ताशी वेग पकडू शकते. तसेच, एकदा ही कार फुल चार्ज केल्यानंतर 461 किमीची रेंज देते असं कंपनीचं म्हणणं आहे. याशिवाय ही इलेक्ट्रिक कार 4 कलर ऑप्शनसह सादर करण्यात आली आहे.
MG ZS 2023 ची वैशिष्ट्ये काय?
MG ZS 2023 मध्ये आता सुरक्षा वैशिष्ट्य म्हणून ADAS लेव्हल 2 वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत. ज्यामध्ये ट्रॅफिक जॅम असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, स्पीड असिस्ट सिस्टम अलर्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन फंक्शन्स आहेत. याशिवाय, सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये मागील पार्किंग सेन्सर्ससह 360-डिग्री कॅमेरा, हिल डिसेंट कंट्रोल, सहा एअरबॅग्ज (ड्युअल, फ्रंट, साईड), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश आहे. MG ZS 2023 कारमध्ये ग्लेझ रेड, अरोरा सिल्व्हर, स्टाररी ब्लॅक आणि कँडी व्हाईट असे चार कलर ऑप्शन्स आहेत.
MG ZS 2023 कारचे इतर स्पेसिफिकेशन्स कोणते?
MG ZS EV ऑल-एलईडी हॉकी हेडलॅम्प आणि टेल-लॅम्प आणि 17-इंच अलॉय व्हीलसह सुसज्ज आहे. ही एसयूव्ही एक्साईट, एक्सक्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह प्रो या तीन प्रकारांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. iSMART नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ZS EV च्या आतील भागात अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. जसे की 10.1-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 7.0-इंच पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 75+ कनेक्टेड कार वैशिष्ट्यांसह डिजिटल की. यासोबतच या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये सनरूफ, एसी, म्युझिक, नेव्हिगेशन आणि अनेक फीचर्स ऑपरेट करण्यासाठी 100+ व्हॉइस रेकग्निशन कमांड देण्यात आले आहेत. ड्युअल-टोन आयकॉनिक आयव्हरी आणि डार्क ग्रे कलर थीमला अनुसरून, इलेक्ट्रिक कारला मागील एसी व्हेंट्स आणि इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राईव्ह मोड देखील मिळतात.
MG ZS 2023 कारचा वेग किती?
या इलेक्ट्रिक कारला उर्जा देण्यासाठी 50.3 kWh बॅटरी वापरली गेली आहे, जी एका चार्जवर 461 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज प्रदान करण्यास सक्षम आहे. कंपनी या ईव्हीवर 8 वर्षांची वॉरंटी आहे. तसेच, यात दिलेली इलेक्ट्रिक मोटर 173 HP ची पॉवर देते.
महत्त्वाच्या बातम्या :























