एक्स्प्लोर

Hyundai Exter First Look Review : Hyundai ने सादर केली नवीन SUV Exter, जबरदस्त फीचर्ससह 'या' कारला देणार टक्कर

Hyundai Exter First Look Review : एक्स्टरच्या कलर ऑप्शन्समध्ये सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल-टोन शेड्सचा समावेश आहे.

Hyundai Exter First Look Review : भारतीय बाजारात एसयूव्ही (SUV) सेगमेंटमधील परवडणाऱ्या दरात आता आणखी एका कारची एन्ट्री झाली आहे. Hyundai ने भारतात आपली सर्वात लहान आणि सर्वात कॉम्पॅक्ट SUV Hyundai Exter लॉन्च केली आहे. ही कार Grand i10 Nios वर आधारित आहे. एक्स्टर ही पेट्रोल-केवळ सीएनजी प्रकार असलेली एसयूव्ही आहे. तसेच, ही कार सात व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये ग्राहकांसाठी कोणती खास वैशिष्ट्य आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

Exter चा लूक कसा आहे?

Exter च्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, या कारचा लूक आकर्षक आणि क्लासी आहे. एक्स्टरला उंच आणि सरळ स्टॅन्स आहेत. तसेच, समोरच्या फॅसिआमध्ये सिग्नेचर एच-आकाराचे एलईडी डीआरएलसह स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आहे जे टेललॅम्प क्लस्टरमध्ये देखील आहेत. सुरक्षित सीट बेल्ट तसेच बसायलाही अगदी कम्फर्टेबल अशा सीट्स आहेत. Exter ची लांबी आणि व्हीलबेस Nios प्रमाणे 3,815mm आणि 2,450mm आहे. तर ते 1,631mmmm वर उंच आहे आणि रुंदी 1,710mm आहे. ही 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हीलवर चालते आणि ह्युंदाईमध्ये पहिल्यांदाच, 'Exter' असं लिहिण्यात आलं आहे.  

एक्स्टरच्या कलर ऑप्शन्समध्ये सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल-टोन शेड्सचा समावेश आहे. यामध्ये कॉस्मिक ब्लू आणि रेंजर एक्स्टरच्या पॅलेटमध्ये नवीन आहेत, तर अॅटलस व्हाईट, टायटन ग्रे, स्टाररी नाईट आणि फायरी रेड हे ब्रँडच्या रंगसंगतीचा एक भाग आहेत. 

इंटर्नल लूक 

Exter चे केबिन तुम्हाला लगेच Nios ची आठवण करून देईल. डॅशबोर्डवरील वेव्ह-पॅटर्न, तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि अगदी आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम हॅचबॅक सिबलिंगकडून घेण्यात आली आहे. एक्स्टर तीन इंटर्नल थीम ऑफर करते. यामध्ये लाईट सेज, कॉस्मिक ब्लू आणि सिल्व्हर असे ऑप्शन्स आहेत. कारच्या मागच्या बाजूस एअरकॉन व्हेंट्स, चार्जिंग पोर्ट्स आणि पॉवर विंडोसह अॅडजस्टेबल हेडरेस्टचा समावेश आहे. 

इतर वैशिष्ट्ये कोणती?

Hyundai Exter मध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा विचार करण्यात आला आहे. सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सहा एअरबॅग्ज आहेत. तसेच, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर-व्ह्यू कॅमेरा, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, कीलेस एंट्री आणि सर्व सीटसाठी थ्री-पॉइंट सीटबेल्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. 

किंमत किती?

एक्स्टरची सुरुवातीची शोरूम किंमत 6 लाख पासून सुरु होते ती 7.97 लाखांपर्यंत आहे. तसेच, या कारची स्पर्धा टाटा पंचशी होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Maruti Suzuki Invicto Review: दमदार वैशिष्ट्यांसह मारुती सुझुकी इनव्हिक्टो सज्ज; टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला देते टक्कर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget