Maruti Swift Cng: मारुती सुझुकी स्विफ्टचा सीएनजी व्हेरियंट लॉन्च, देते 30 किमीचा जबरदस्त मायलेज
Maruti Swift Cng: लाडकी मारुती स्विफ्ट आता नवीन रूपात परतली आहे कंपनीने याचा स्विफ्ट एस-सीएनजी व्हेरियंट लॉन्च केला आहे.
Maruti Swift Cng: लाडकी मारुती स्विफ्ट आता नवीन रूपात परतली आहे कंपनीने याचा स्विफ्ट एस-सीएनजी व्हेरियंट लॉन्च केला आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत 7.77 लाख रूपये, एक्स-शोरूम किंमतीला लॉन्च करण्यात आली आहे. स्विफ्ट एस-सीएनजी VXi (7.77 लाख रुपये) आणि ZXi (8.45 लाख रुपये) या दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या सीएनजी कारमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट सर्वात जबरदस्त कार ठरू शकते. मारुती सुझुकीचा दावा आहे की, स्विफ्ट एस-सीएनजी 1 किलो सीएनजीवर 30.90 किमीचा मायलेज देते.
स्विफ्ट CNG मध्ये, कंपनीने 1.2 लीटर के-सिरीज, ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन दिले आहे. जे 6,000 rpm वर 77.49 पॉवर आणि 98.5 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. याशिवाय कंपनीने नवीन स्विफ्टसाठी मासिक सदस्यता योजना देखील सादर केली आहे. ज्याचे शुल्क प्रति महिना 16,499 रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले की, ''स्विफ्टही प्रसिद्ध कार आहे. कंपनी-फिट मारुती सुझुकी एस-सीएनजी तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे. आपल्या परफॉर्मन्सने स्विफ्ट्सने 26 लाखांहून अधिक ग्राहकांना भुरळ घातल्यानंतर स्विफ्ट आता CNG व्हेरियंटमध्येही उपलब्ध आहे."
मारुती स्विफ्टबद्दल बोलायचे झाले तर हिचा आकार सामान्य हॅचबॅकसारखा आहे. स्विफ्टच्या नवीन मॉडेल्समध्ये कंपनी एलईडी प्रोजेक्टर लाईट आणि एलईडी स्टॉप लाईट दिले आहे. स्विफ्टचे फ्रंट डिझाइन बर्यापैकी स्लिम ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे ही अतिशय आकर्षक दिसते. याच्या समोर सुझुकीचा लोगो असलेली काळी ग्रिल आहे. तसेच कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील उपलब्ध आहेत. स्विफ्टचा ग्राउंड क्लीयरन्स 163mm इतका आहे.
मारुती स्विफ्टमध्ये ड्युअल टोन आणि सिंगल टोन इंटीरियरचा पर्याय उपलब्ध आहे. नवीन स्विफ्टमध्ये Android Auto आणि Apple CarPlay सह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉइस कमांडसह कीलेस एंट्री, 4.2-इंच रंगीत इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पुश-बटण स्टार्ट-स्टॉप सारखे फीचर्स मिळतात. यासोबतच यात ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल असिस्टसह ESP, पार्किंग सेन्सर्ससह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Hyundai Tucson review: लक्झरियस आणि ADAS सारखे आधुनिक फीचर्स, जाणून घ्या कशी आहे नवीन Hyundai Tucson
- 2022 Royal Enfield Bullet: येत आहे नवीन बुलेट बाईक, जाणून घ्या किती असेल किंमत आणि फीचर्स
- टाटा-पंचचा विक्रमी 'पंच' ; एक लाख विक्रीचा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान SUV