2022 Royal Enfield Bullet: येत आहे नवीन बुलेट बाईक, जाणून घ्या किती असेल किंमत आणि फीचर्स
2022 Royal Enfield Bullet 350: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्ड आपल्या दमदार बाईकसाठी ओळखली जाते. कंपनीने अलीकडेच देशातील सर्वात हलकी बाइक हंटर 350 लॉन्च केली आहे.
2022 Royal Enfield Bullet 350: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्ड आपल्या दमदार बाईकसाठी ओळखली जाते. कंपनीने अलीकडेच देशातील सर्वात हलकी बाइक हंटर 350 लॉन्च केली आहे. ही बाईकही रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 आणि Meteor 350 प्रमाणे J-सिरीज प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
स्क्रॅम्बलर लूक असलेल्या या बाईकची किंमत कंपनीच्या इतर बाईक Bullet 350 सारखीच (जवळपास 1.50 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, Royal Enfield लवकरच एक नवीन Bullet 350 बाईक लॉन्च करू शकते. कशी असेल कंपनीची आगामी बुलेट बाईक हे जाणून घेऊ...
इंजिन
नवीन बुलेट 350 मध्ये सध्याच्या 346 सीसी इंजिनच्या जागी नवीन हंटरमध्ये वापरलेले 349 सीसी इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. हेच 349 cc इंजिन Royal Enfield च्या Classic 350 आणि Meteor 350 मध्ये देखील आहे. जे इंजिन 20.2 hp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 5-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स दिसू शकतो. नवीन बुलेट 350 मधून किक स्टार्ट सिस्टम काढून टाकली जाण्याचीही अपेक्षा आहे.
लूक आणि डिझाइन
नवीन जनरेशन बुलेट 350 ला सिंगल-चॅनेल अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम समोर डिस्क ब्रेक सिस्टम आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक सिस्टम दिली जाऊ शकते. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन Shock Absorber मिळण्याची शक्यता आहे. क्लासिक 350 ची डबल डाउनट्यूब फ्रेम ही बाईक डिझाइन करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
फीचर्स
सध्याच्या बुलेट 350 मध्ये कोणतीही नवीन आणि वेगेळे असे फीचर्स देण्यात आलेले नाही. पण नवीन बुलेटमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टीम दिसणे अपेक्षित आहे. यासह एनालॉग स्पीडोमीटरसह लहान आकाराच्या डिस्प्लेसह एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळू शकतो.
किती असेल किंमत?
Royal Enfield च्या सध्याच्या Bullet 350 ची एक्स-शोरूम किंमत 1.48 लाख ते 1.63 लाख रुपये आहे. मात्र यांच्या नव्या व्हेरिएंटची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा जास्त असेल. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 1.7 लाख रुपये असावी, असा अंदाज आहे. दरम्यान, कंपनी आपली ही नवीन बाईक कधी लॉन्च करणार, याबाबत अधप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.