एक्स्प्लोर

Hyundai Tucson review: लक्झरियस आणि ADAS सारखे आधुनिक फीचर्स, जाणून घ्या कशी आहे नवीन Hyundai Tucson

Hyundai Tucson 2022: दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने नुकतीच आपली नेक्स्ट जनरेशन Hyundai Tucson भारतात लॉन्च केली आहे.

Hyundai Tucson 2022: दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने नुकतीच आपली नेक्स्ट जनरेशन Hyundai Tucson भारतात लॉन्च केली आहे. Tucson ही कंपनीची आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. कंपनीने आता Tucson चे थर्ड जनरेशन मॉडेल भारतीय बाजारात उतरवला आहे. आपण याच कराचा संपूर्ण रिव्ह्यू जाणून घेणार आहोत.  

डिझाइन

Tucson च्या डिझाइनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.  या एसयूव्हीमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, हेडलाइट, बंपर आणि हुड देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन अलॉय व्हीलसह नवीन टेल लाईट आणि बॅक बंपर देखील देण्यात आले आहेत. या नवीन एसयूव्हीच्या समोर एक मोठी क्रोम ग्रिल आहे. जी ब्लॅक आउट फिनिशमध्ये देण्यात आली आहे. टर्न सिग्नल लाइट देखील ग्रिलवरच दिलेली आहे. याच्या नवीन डिझाइनमुळे ही एसयूव्ही आता पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी आणि आकर्षक दिसत आहे. सध्या विकल्या जात असलेल्या इतर Hyundai SUV प्रमाणे नवीन Tucson ला बंपरवर हेडलाइट्स देण्यात आले आहेत. समोरच्या बंपरच्या तळाशी प्लॅस्टिक क्लेडिंग देखील आहे. व्हेंटिलेशनसाठी यात बंपरवर व्हेंट दिले आहे.

नवीन Tucson चा मागील लूक देखील जबरदस्त आहे. कारची संपूर्ण मागील लाईटिंग LED मध्ये आहे. मागील विंडस्क्रीनला Hyundai बॅज मिळतो. तर स्पॉयलरला अतिरिक्त ब्रेक लाइट मिळतो. यासोबतच यामध्ये बॅश प्लेटही देण्यात आली आहे. जी नवीन Tucson च्या पुढील भागासारखी आहे.

इंटीरियर आणि फीचर्स 

Tucson च्या बाह्य डिझाइनप्रमाणेच आतील भाग देखील पूर्णपणे नवीन इंटीरियरसह देण्यात आले आहे. नवीन Tucson आता पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त वाटते. याचे कारण म्हणजे याला आता मोठे पॅनोरामिक सनरूफ मिळाले आहे. जे Tucson इंटीरियरला आणखी हवेशीर बनवते. इंटीरियरला प्रीमियम फील देण्यासाठी संपूर्ण केबिनमध्ये सॉफ्ट टच मटेरियल वापरण्यात आले आहे. जे अतिशय दर्जेदार आहे. कारच्या आतील लेदरेट सीट्स मोठ्या आहेत. समोरच्या दोन्ही सीटवर व्हेंटिलेशन आणि हीटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बसण्याची स्थिती आरामदायक करण्यासाठी ड्रायव्हर सीटला मेमरी फंक्शनसह 10-वे अॅडजस्टेबल पॉवर सीट अॅडजस्टरसह देण्यात आले आहे. कंपनीने मागच्या सीटवरील प्रवाशांच्या आरामाचीही पूर्ण काळजी घेतली आहे.

नवीन Tucson मधील मल्टी लेयर डॅशबोर्ड खूपच आकर्षक दिसतो आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टमसाठी एअर व्हेंट्स फक्त HVAC सेटअप चालू असतानाच उघडतात. डॅशबोर्डवर दोन मोठे 10.25 इंच डिस्प्ले आहेत. यात ड्रायव्हर डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी दुसरा डिस्प्ले आहे. जो डॅशबोर्डच्या मध्यभागी आहे. इन्फोटेनमेंट डिस्प्ले मोठा आणि वापरण्यास सोपा आहे. हे अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, तसेच ह्युंदाईच्या ब्लूलिंक सूट अंतर्गत कनेक्ट केलेल्या कार फीचर्सना देखील सपोर्ट करतो. कारच्या आत 8-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे, जे खूप प्रीमियम आहे.

2022 Hyundai Tucson सेफ्टी फीचर्स 

कंपनीने नवीन टक्सनमध्ये सुरक्षा फीचर्समध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. Hyundai च्या मते Tucson 60 पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्सने सुसज्ज आहे. यामध्ये सहा एअरबॅग्ज, ऑल व्हील डिस्क ब्रेक, पार्किंग असिस्ट, पार्किंग कॅमेरा, रेन सेन्सिंग वायपर्स, डाउनहिल ब्रेक कंट्रोल, ईएससी आणि टायर प्रेशर सिस्टम यांचा समावेश आहे.

Hyundai च्या SmartSense Level-2 ADAS सिस्टीमसह नवीन Tucson लॉन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये ब्लाइंड-स्पॉट असिस्टन्स, ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन फॉलो असिस्ट, हाय बीम असिस्ट आणि सराउंड व्ह्यू मॉनिटर यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

इंजिन 

नवीन Hyundai Tucson 2.0-लिटर पेट्रोल आणि 2.0-डिझेल इंजिनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Tucson चे पेट्रोल इंजिन 6,200 rpm वर 154 bhp पॉवर आणि 4,500 rpm वर 192 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. पेट्रोल Tucson फक्त फ्रंट-व्हील ड्राइव्हमध्ये दिले जाते. टॉप-एंड Tucson ची किंमत 34.3 लाख रुपये आहे.

आम्हाला काय आवडते- लूक, गुणवत्ता, जागा, फीचर्स, performance

आम्हाला काय आवडते नाही- स्टीयरिंग पॅडल शिफ्टर्सचा अभाव, 7-सीटर पर्याय नाही

संबंधित बातमी: 

नवीन Hyundai Tucson भारतात लॉन्च, जबरदस्त फीचर्ससह किंमत आहे...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget