Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Nashik News : मनमाड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Nashik News : नाशिक : नायलॉन मांजावर (Nylon Manja) बंदी असतानादेखील अनेक ठिकाणी तो सर्रासपणे विकला गेला. नाशिक (Nashik), नंदुरबारमध्ये (Nandurbar) या नायलॉन मांजामुळे दोन जणांचा बळी गेलेला असतानाच काल मनमाड पोलीस ठाण्याच्या (Manmad Police Station) कॉन्स्टेबल यांचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला. रेखा फडताळे असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकच्या (Nashik News) खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर शासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येत असली तरी नाशिक जिल्ह्यातील अनेक शहरात नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होती. आणि याचाच फटका मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी बसला. मनमाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल रेखा फडताळे येवला येथे बंदोबस्त करून मनमाडकडे येत असताना त्यांचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला.
नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले व अधिक उपचारासाठी तात्काळ नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मुळात नायलॉन मांजा व चायनीज मांजा यांच्यावर बंदी असताना देखील अनेक शहरात सर्रासपणे विकला जात असताना याबाबत कोणीच कशी दखल घेतली नाही? हा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला असून ज्यांनी कोणी मांजा विक्री केली त्यांच्यावर कारवाई होईल का? असा सवाल देखील जखमी झालेल्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
पाच वर्षाच्या चिमुकल्यासह दोघे तरुण गंभीर जखमी
दरम्यान, येवल्यात विविध घटनांमध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्यासह दोन तरुणांचे गळ्याला कापले गेल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. कोटमगाव येथे झालेल्या घटनेत देवराज कोटमे या पाच वर्षीय चिमुकल्याच्या नायलॉन मांजामुळे इजा होऊन 14 टाके पडले, तर पिंपळखुटे येथील शुभम पवार यांना देखील गळ्याला नायलॉन मांजा मुळे इजा होवून 20 टाके पडले आहेत. तर तिसऱ्या घटनेत अंदरसुल येथील दीपक राऊत या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून जखम झाल्याने त्यालाही 20 टाके पडले आहेत. प्रशासनाने आवाहन करूनही नायलॉन मांजा सर्रास वापरला जात असून रोजचं नायलॉन मांजामुळे जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या