Maruti S-Presso : मारुती सुझुकी S-Presso चे 'Xtra' लिमिटेड एडिशन सादर; काय आहेत नवीन बदल? वाचा सविस्तर
S-Presso Limited Edition : मारूती सुझुकीने S Presso 'Xtra' लिमिटेड एडिशनच्या किंमतीचा अद्याप खुलासा केलेला नाही.
![Maruti S-Presso : मारुती सुझुकी S-Presso चे 'Xtra' लिमिटेड एडिशन सादर; काय आहेत नवीन बदल? वाचा सविस्तर maruti s presso maruti suzuki unveiled the limited edition of s presso named as xtra marathi news Maruti S-Presso : मारुती सुझुकी S-Presso चे 'Xtra' लिमिटेड एडिशन सादर; काय आहेत नवीन बदल? वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/e664a23c83ec8005cc1bef32782eff261672471116281358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
S-Presso Limited Edition : 2022 वर्षाला निरोप देताना अनेक मोठ्या दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. काही कार निर्मात्यांनी नवीन कार सादर केल्या आहेत तर काही कार निर्मात्यांनी कारचा लूकच बदलला आहे. यामध्ये दिग्गज कार निर्माता कंपनी मारूती सुझुकीने मायक्रो-एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली कार एस-प्रेसोचे लिमिटेड एडिशन सादर केले आहे. S-Presso चे लिमिटेड व्हर्जन 'Xtra' नियमित मॉडेलपेक्षा जास्त अपडेटेड फिचर्स आहेत. कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारचा एक टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये लिमिटेड एडिशन S-Presso च्या कॉस्मेटिक अपग्रेडमध्ये सिल्व्हर फिनिश, सिल्व्हर फिनिश इन्सर्टमध्ये नवीन फ्रंट स्किड प्लेट समाविष्ट असेल.
इंटीरियरमध्ये 'हे' बदल झाले
लिमिटेड एडिशन S-Presso Xtra मध्ये आतील बाजूस काही बदल आहेत. आतल्या दरवाजाच्या पॅनल्स आणि डॅशबोर्डवर लाल इन्सर्टसह विशेष सीट अपहोल्स्ट्री आणि नवीन फ्लोअर मॅट्स आहेत. कंपनीने या 'एक्स्ट्रा' लिमिटेड एडिशनची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, या कारच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
इंजिन कसे आहे?
S-Presso ही कंपनीच्या कमी विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. Xtra Limited Edition ला नेहमीच्या मॉडेलप्रमाणेच 1-लिटर ड्युअल-जेट, ड्युअल-VVT, K-सिरीज इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन 64 hp पॉवर आणि 85 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यात मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही गिअरबॉक्सेसचा पर्याय मिळतो. तथापि, काही दिवसांपूर्वी, कारला ग्लोबल-NCAP क्रॅश चाचणीनुसार केवळ 1-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
किंमत किती असेल?
कंपनीने अद्याप S Presso 'Xtra' लिमिटेड एडिशनच्या किंमतींचा खुलासा केलेला नाही. पण त्याच्या रेग्युलर मॉडेलच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.49 लाख रुपये आहे, त्यामुळे मर्यादित एडिशनची किंमत यापेक्षा जास्त असू शकते.
रेनॉल्ट ट्रायबरला देणार टक्कर
Renault Triber ला 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते, जे 72 bhp पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करते. कारला 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड AMT युनिटचा पर्याय मिळतो. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.75 लाख रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Nissan X Trail Car : फॉर्च्युनरला टक्कर देणार Nissan X Trail कार; नवीन वर्षात 'या' दिवशी होणार लॉन्च
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)