Nissan X Trail Car : फॉर्च्युनरला टक्कर देणार Nissan X Trail कार; नवीन वर्षात 'या' दिवशी होणार लॉन्च
Nissan X Trail Car : निसान एक्स-ट्रेलची लांबी 4680 मिमी, रुंदी 2065 मिमी आणि उंची 1725 मिमी असेल. त्याचा व्हीलबेस 2750mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 205mm असेल.
Nissan X Trail Car : जपानची कार उत्पादक निसान (Nissan) मोटर्सने या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये भारतात निसान एक्स-ट्रेल आणि ज्यूक एसयूव्ही सादर केल्या आहेत. निसानने भारतात तिच्या दोन जागतिक SUV ची चाचणी सुरू केली आहे. त्यापैकी निसान एक्स-ट्रेल 2023 च्या मध्यापर्यंत बाजारात येऊ शकते. ही एसयूव्ही टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देईल. ही कार रेनॉल्ट-निसानच्या CMF-C प्लॅटफॉर्मवर आधारित चौथ्या पिढीचे मॉडेल असेल. ही कार CBU मार्गाने भारतात येईल.
पॉवरट्रेन कशी आहे?
नवीन X-Trail ही ई-पॉवर हायब्रिड टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेली कंपनीची भारतातील पहिली कार असेल. त्याच्या जागतिक व्हेरिएंटला 1.5L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह लाईट हायब्रिड आणि 1.5L टर्बो पेट्रोल युनिटसह मजबूत हायब्रिड पॉवरट्रेन मिळते. लाईट हायब्रीड व्हेरिएंटला 2WD प्रणाली मिळते आणि 163PS/ 300 Nm आउटपुट मिळते. ही कार 9.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि 200 किमी/तास इतकी वेगवान आहे. तर, ई-पॉवर मजबूत हायब्रिड टेक्नॉलॉजीने सुसज्ज 1.5L टर्बो पेट्रोल इंजिनला 2WD आणि AWD ड्राइव्हट्रेनचा ऑप्शन मिळतो. 2WD सेटअपसह ते 204PS/300Nm आउटपुट करू शकते आणि 4WD सेटअपसह ते 213PS/525Nm आउटपुट करू शकते.
कारचा लूक कसा असेल?
निसान एक्स-ट्रेलची लांबी 4680 मिमी, रुंदी 2065 मिमी आणि उंची 1725 मिमी असेल. त्याचा व्हीलबेस 2750mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 205mm असेल. त्याच्या ग्लोबल व्हेरियंटला 5 आणि 7-सीटरच्या दोन सीटिंग कॉन्फिगरेशन मिळतात.
वैशिष्ट्ये कशी आहेत?
नवीन Nissan X Trail SUV ला प्रगत ड्रायव्हर सहाय्यता प्रणाली, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ट्राय-झोन क्लायमेट कंट्रोल, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एलईडी हेडलॅम्प, हेड-अप डिस्प्ले (HUD) मिळेल. , इलेक्ट्रिक टेलगेट, 360 डिग्री कॅमेरासह इतर अनेक वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील.
फॉर्च्युनरशी स्पर्धा करेल
Toyota's Fortuner ला दोन इंजिन ऑप्शन, 166 PS/245 Nm आउटपुटसह 2.7-लीटर पेट्रोल इंजिन आणि 204PS/500Nm आउटपुटसह 2.8-लिटर टर्बो-डिझेल इंजिन मिळते. यात 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. ही कार 2WD आणि 4WD पर्यायांमध्ये येते.
महत्त्वाच्या बातम्या :