Mahindra Thar.e: फ्युचरिस्टिक लूक, मस्क्युलर डिझाइन अन् भरपूर अद्ययावत फिचर्स; महिंद्राची दमदार 'थार इलेक्ट्रिक' SUV लॉन्च!
Mahindra Thar.e: महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडनं आपली नवीकोरी इलेक्ट्रिक थार लॉन्च केली आहे.

Mahindra Thar.e: महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) लिमिटेडनं केपटाऊनमध्ये आयोजित केलेल्या ग्लोबल फ्युचरस्केप (FutureScape) इव्हेंटमध्ये महिंद्रा थार (Mahindra Thar) म्हणजेच, थारचे इलेक्ट्रिक व्हर्जन (Mahindra Thar.e) सादर केलं आहे. हे थारचं 5 डोअर व्हर्जन आहे, ज्याच्या ICE व्हर्जनची प्रतिक्षा अनेक ग्राहक करत आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, बॉर्न इलेक्ट्रिक रेंजचा एक भाग म्हणून Thar.e डेव्हलप केली जाईल, म्हणजेच, ते सध्याच्या ICE व्हर्जन (रेग्युलर पेट्रोल-डिझेल) मॉडेलचं इलेक्ट्रिक व्हर्जन नसेल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे रिडिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीचा नवा लोगो दिसणार आहे.
कशी असेल Mahindra Thar.e?
कंपनीनं Mahindra Thar.e ला एक अतिशय आकर्षक आणि फ्युचरिस्टिक लूक देण्यात आला आहे. रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत नवी इलेक्ट्रिक थार खूपच मस्क्युलर आणि अग्रेसिव्ह दिसतेय. या थारला चौकोनी आकाराचा LED हेडलॅम्पसोबत राउंड-ऑफ कॉर्नर आणि समोरच्या बाजूला एक ग्लॉसी अपराइट नोज देण्यात आली आहे. समोरील स्टीलच्या बंपरमुळे खडबडीत लूक मिळतो, तर स्क्वेअर-आउट व्हील आर्च आणि नवीन अलॉय व्हील साइड प्रोफाइल अपडेट करतात. मागील बाजूस स्पेअर व्हील आणि स्क्वेअर LED टेललॅम्प देण्यात आले आहेत.

थार इलेक्ट्रिक इंटिरियर
Mahindra Thar.e ची रचना कंपनीनं एक अॅडव्हान्स व्हेइकल म्हणून केली आहे. थारची केबिन पाहून तुम्हाला याची प्रचिती येते. त्याच्या डॅशबोर्डला मिनिमम डिझाइन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि नवीन स्टीयरिंग व्हील आहे. याशिवाय कंपनीनं त्यांच्या इंटीरियरबद्दल अजून कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
Mahindra Thar Electric (Thar.e) and Global Pickup based on Scorpio-N. #Mahindra #MahindraThar pic.twitter.com/DyV8eaMivE
— Ashwani Kumar (@ashwinsatyadev) August 16, 2023
पॉवर आणि परफॉर्मन्स
कंपनीचं म्हणणं आहे की, नवीन महिंद्रा थार इलेक्ट्रिक नवीन INGLO P1 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, जी एसयूव्हीला उत्तम ग्राउंड क्लिअरन्स तसेच, सर्वोत्तम ऑफ-रोडिंग क्षमता प्रदान करेल. INGLO म्हणजेच, IN- (INDIA) आणि GLO (Global). SUV मध्ये अतिरिक्त दरवाजे आणि बॅटरी पॅक बसवण्यासाठी Thar.e चा व्हिलबेस 2,775 mm ते 2,975 mm पर्यंत असण्याची अपेक्षा आहे.
रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा सुरुवातीला XUV.e8 सारख्या जुन्या मॉडेल्ससाठी INGLO बॅटरी आणि मोटर्स चिनी कंपनी बिल्ड युवर ड्रीम (BYD) मधून मागवणार आहे. परंतु Thar.e बहुधा फॉक्सवॅगनकडून मिळवलेल्या अधिक पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरचा वापर करेल. माहितीनुसार, Inglo प्लॅटफॉर्म सर्व व्हील ड्राइव्हसाठी सुमारे 250 kW चे पॉवर आउटपुट जनरेट करते. थार इलेक्ट्रिकच्या ड्रायव्हिंग रेंज किंवा पॉवर इत्यादींबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.
























