Mahindra Scorpio-N चा मोठा विक्रम; 'हे' वाळवंट सर्वात वेगाने पार करून बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Mahindra Scorpio-N Guinness World Record : Mahindra Scorpio-N बरोबर स्पर्धा करणाऱ्या वाहनांमध्ये Hyundai Alcazar, XUV700 7-सीटर, Tata Safari सह अनेक वाहनांचा समावेश आहे.
Mahindra Scorpio-N Guinness World Record : देशातील सर्वात आघाडीची SUV वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा अनेकदा नवनवीन प्रयोग करत असते. महिंद्रा स्कॉर्पिओ एन आता ऑस्ट्रेलियातील सिम्पसन वाळवंटातील अत्यंत तीव्र परिस्थितीत पार करणारे सर्वात वेगवान वाहन ठरले आहे. स्कॉर्पिओ एन एसयूव्हीने यशस्वी धाव घेत ऑस्ट्रेलियन वाळवंट ओलांडून सर्वात जलद प्रवास पार करण्याचा गिनीज रेकॉर्ड केला आहे. महिंद्रा कंपनीचा असा दावा आहे की, या संपूर्ण प्रवासादरम्यान स्कॉर्पिओ एनने 50 अंश सेल्सिअस तापमान सहन करत 1100 वाळूचे ढिगारे पार केले. या विक्रमी प्रवासाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे.
नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
महिंद्रा स्कॉर्पिओ-एनने 50 अंश सेल्सिअस (बाहेरील) तापमानात 13 तासांत 1100 वाळूचे ढिगारे पार करून हा विक्रम केला आहे. Mahindra Scorpio-N एसयूव्ही जीन कॉर्बेट (ड्रायव्हर) आणि बेन रॉबिन्सन (सह-चालक) चालवत होते. याबरोबर छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफरची टीमही होती, यांनी हे चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
सर्वांचाच मोलाचा वाटा
महिंद्राच्या या कामगिरीवर बोलताना ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अॅंड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, महिंद्रा अॅंड महिंद्रा ली. चे आर वेलुसामी म्हणाले, हे यश केवळ स्कॉर्पिओ-एनच्या जबरदस्त इंजिनिअरिंग आणि कार्यक्षमतेचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करत नाही, तर यामध्ये सगळ्यांचा तितकाच मोलाचा सहभाग आहे. यामध्ये अनुभवी इंजिनिअरच्या टीमनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सिम्पसन वाळवंट हे जगभरातील मोटर रायडिंग प्रेमींसाठी एक आवडते ठिकाण आहे. आणि या ठिकाणी Scorpio-N ने नवा विक्रम करून या जागेला अधिक महत्त्व प्राप्त करून दिले आहे.
13 तासांत 85 किमीचा प्रवास पूर्ण
कंपनीने सांगितल्यानुसार, Scorpio-N चा हा विक्रमी प्रवास बर्डस्विले येथून पहाटे सुरू झाला आणि 385 किमी अंतर कापून अल्कासेल्त्झर बोर येथे 13 तासांत संपला. एसयूव्हीच्या या शर्यतीने समुद्रसपाटीपासून 20 मीटर उंचीवर असलेल्या सॉल्ट फ्लॅट्सवर हे यश संपादन केलं. या ठिकाणी ओलावा असल्या कारणाने हा प्रवास खूपच आव्हानात्मक होता असंही महिंद्रा यांच्या टीमकडून सांगण्यात आलं.
'या' कारशी करणार स्पर्धा
Mahindra Scorpio N च्या प्रतिस्पर्धी वाहनांमध्ये Hyundai Alcazar, XUV700 7-सीटर, Tata Safari, Toyota Innova Crysta, Hector Plus सारख्या वाहनांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Car : Maruti Invicto की Toyota Innova Hycross कोणती कार सर्वात भारी? वाचा संपूर्ण माहिती