Car Safety Features : कारमधील हे सेफ्टी फीचर्स आहेत मोठ्या कामाचे;असे करतात तुमचे संरक्षण
Car Safety Features : कारमध्ये असणाऱ्या सेफ्टी फीचर्सबद्दल आणि त्याच्या फायद्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे.
ADAS in Cars : सध्या ऑटो कंपन्यांकडून सेफ्टी फीचर्सवर (Car Safety Features) अधिक लक्ष दिले जात आहे. विविध कंपन्यांकडून वेगवेगळी फीचर्स दिली जात आहेत. या कारणांनी कारच्या किंमतीतही वाढ होते.कारमध्ये असणाऱ्या सेफ्टी फीचर्सबद्दल आणि त्याच्या फायद्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे.
अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल - हे फीचर कार चालकाने ठरवलेल्या वेगाने धावते आणि आवश्यक असल्यास ते स्वयंचलितपणे वाढवू किंवा कमी करू शकते. त्यामुळे लांबच्या प्रवासात चालकाचा थकवा कमी करण्यासोबतच मागे धावणाऱ्या वाहनांपासूनही ठराविक अंतर राखले जाते.
ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग - हे फीचर वाहनाच्या मार्गावर येणारे ब्लाइंड स्पॉट ओळखून ड्रायव्हरला सतर्क करण्याचे काम करते. जे लाईट्स किंवा ऑडिओ व्हॉईसद्वारे करता येते. त्यामुळे चालकाचे लक्ष न राहिल्याने होणारा मोठा अपघात टळू शकतो.
पेडेस्ट्रियन डिटेक्शन सिस्टम - हे फीचर कॅमेरे आणि सेन्सरच्या मदतीने वाहनाच्या मार्गावर येणाऱ्या पादचाऱ्यांना ओळखण्याचे काम करते. जेणेकरून अपघात टाळता येतील.
रियर व्ह्यू कॅमेरा- हे फीचर कारच्या मागील बाजूचे स्पष्ट दृश्य देते, जे कारच्या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये पाहिले जाऊ शकते. त्यामुळे कार रिर्व्हस घेत असताना चालकाचा त्रास वाचतो.
फॉरवर्ड कोलिजन मिटिगेशन- जेव्हा कार एखाद्या गोष्टीला धडकणार असेल तेव्हा रस्त्याचे निरीक्षण करून कार स्वयंचलितपणे थांबवण्याचे काम हे फीचर करते. जर ड्रायव्हरने योग्य वेळी ब्रेक लावले नाही तर सुरक्षा स्तर वाढवण्याचे काम करते.
ट्रॅक्शन कंट्रोल- हे फीचर वेगवेगळ्या पॉवर आणि ब्रेकसह वेगवेगळ्या चाकांना नियंत्रित करून निसरड्या भूभागावर वाहन घसरण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे संभाव्य अपघात टळला जातो.
अडॅप्टिव्ह हेडलाइट- हे फीचर वाहनाच्या वेगानुसार आणि स्टीयरिंगच्या दिशेनुसार कारचे हेडलाइट्स समायोजित करते. त्यामुळे रात्री वाहन चालवणे सोपे झाले आहे.
इमर्जन्सी ब्रेक असिस्ट- कार कोणत्याही वस्तूला आदळल्यास हे फीचर आपोआप ब्रेक लावून कार थांबवते.
साइड कर्टन एअरबॅग- कारमध्ये देण्यात आलेल्या या एअरबॅग्ज अपघाताच्या वेळी प्रवाशाच्या डोक्याचे संरक्षण करण्याचे काम करतात.
चाइल्ड सेफ्टी लॉक- हे फीचर कारच्या मागच्या सीटसाठी उपलब्ध आहे, जे मुलांना आतून दरवाजा लॉक करण्यापासून थांबवण्यास मदत करते. जेणेकरून गाडी चालत असताना मागच्या सीटवर बसलेली मुले ती उघडू शकत नाहीत.