Mahindra BE.07 Design न्यू ब्रॅंड Mahindra BE.07 डिझाइन डिटेल्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?
Mahindra BE.07 Design : महिंद्रा आपल्या नव्या EV मॉडेलच्या डिझाईन्स फायनल झाल्या आहेत. त्या लवकरच लॉंच होणार असल्याची माहिती आहे. EV SUV मध्ये दोन मॉडेल्स असणार आहे.
Mahindra BE.07 Design : महिंद्रा (Mahindra Car) आपल्या नव्या EV मॉडेलच्या (Auto News) डिझाईन्स फायनल झाल्या आहेत. त्या लवकरच लॉंच होणार असल्याची माहिती आहे. EV SUV मध्ये दोन मॉडेल्स असणार आहे. BE.05 पहिलं मॉडेल असेल तर BE.07 दुसरं मॉडेल असणार आहे. दोन्ही मॉडेलमध्ये काही वेगळे फिचर्स देण्यात आले आहेत.
डिझाइन कसं असेल?
डिझाइन पेटंटवरून असे दिसून आले आहे की महिंद्रा बीई.07 त्याच्या कॉन्सेप्ट मॉडेलसारखेच आहे, जे पहिल्यांदा 15 ऑगस्ट 2022 रोजी सादर करण्यात आले होते. प्रोडक्शन-स्पेक बीई.07 मध्ये साधी एसयूव्ही डिझाइन असेल, स्पोर्टी बीई.05 पेक्षा कमी क्रीज आणि लाइन्स असतील आणि फ्लॅट लूक असेल. मोठी एसयूव्ही बीई.0.5 च्या 4.3 मीटर लांबीपेक्षा 4.6 मीटर लांब आहे. यात सी-आकाराचे हेडलाइट्स आणि टेल-लाइट्स आहेत. 4,565 मिमी लांबी, 1,900 मिमी रुंदी आणि 1,660 मिमी उंची, 2,775 मिमी लांब व्हीलबेस सह हे मॉडेल बीई.07 मारुती ईव्हीएक्स, ह्युंदाई क्रेटा ईव्ही आणि टाटा कर्व्ह ईव्हीपेक्षा वर असेल.
इटिरिअर कसं असेल?
पेटंट फोटोमध्ये BE.07 चे इंटिरियर दिसत नाही. पण जेव्हा कॉन्सेप्ट मॉडेल समोर आलं तेव्हा महिंद्राने केबिनचा प्रिव्ह्यू दिला. डॅशबोर्डवर तीन भागांची मोठी स्क्रीन दिसली, एक मोठं सनरूफ वगळता कोणतेही फिजिकल बटन, फिचर्स टच आणि हॅप्टिक फीडबॅकद्वारे कंट्रोल केले जाऊ शकतात.
महिंद्रा बीई.07 रेंज, बॅटरी
INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असलेल्या महिंद्राच्या ईव्ही एसयूव्हीच्या बीई रेंजमध्ये 60-80 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक मिळू शकतो. त्याला 435 ते 450 किमी (WLTP) रेंज मिळण्याची शक्यता आहे. बीई.07 साठी बॅटरी पॅकची माहिती अजून समोर आली नाही. रिअर व्हील ड्राइव्ह आणि ऑल व्हील ड्राइव्ह व्हेरियंटही दिले जाऊ शकतात. इलेक्ट्रिक मोटर्सचे आउटपुट आरडब्ल्यूडी बीई.07 साठी 231-286 एचपी आणि AWD मॉडेलसाठी 340-394 hp दरम्यान असेल. सध्या अनेक SUV लॉंच होणार आहे. 2024मध्ये नव्या SUV मॉडेल्सची रांगल लागणार आहे. त्यात कोणती गाडी सगळ्यात चांगली ठरते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सगळ्या गाड्या चांगल्या रेंजमध्ये येणार आहे. कारप्रेमी सगळे या SUV गाड्यांची आतुरतेनं वाट बघत आहे.
इतर महत्वाची बातमी-