एक्स्प्लोर
Kia Carens : किआ मोटार कंपनीच्या किआ कारेन्सची पहिली झलक , 7 सीटरची कार लवकरच विक्रीसाठी
किआ या प्रसिद्ध कार कंपनीने आपली नवी कोरी 7 सीटर कारची पहिली झलक जगासमोर आणली आहे. किआ कारेन्स गाडी लवकरच विक्रिसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे.
Kia Carens : किआ कार कंपनीने मागील काही वर्षात भारतात गाड्या लाँच करण्यास सुरुवात केली आहे. सोनेट, सेल्टॉस अशा काहीच गाड्या कंपनीने आतापर्यंत बाजारात आणल्या असल्या असून आता चौथी कार कंपनीने नुकतीच सर्वांसमोर आणली आहे. किआ कारेन्स (Kia Carnes) असं या गाडीचं नाव असून ही एक 7 सीटर एसयुव्ही आहे. आतापर्यंत किआ कंपनींच्या गाड्यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता किआ कारेन्सलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आसा कंपनी व्यक्त करत आहे.
किआ इंडियाने लॉन्च केलेली ही किआ कारेन्स कंपनीच्या सेल्टॉस या गाडीवर आधारीत असली तरी तिचं डिझाईन काहीसं वेगळं आहे. गाडीत आरामदायी इंटेरियर, स्मार्ट कनेक्टिव्हीटी फिचर्स, बोल्ड डिझाईन आणि बसणाऱ्यांसाठी आरामदायी जागा अशा सुविधा असणार आहेत. यागाडीची विशेष गोष्ट म्हणजे अधिक व्यक्ती गाडीत बसू शकणार असल्याने किआ कॅरेन्सची रचना ज्यांना एकत्र प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे अशा मोठ्या कुटुंबासाठी खास करण्यात आली आहे.
किआ कारेन्स
अशी आहे किआ कारेन्स
किआ कारेन्स कंपनीचे अनोखे आणि शक्तिशाली डिझाइन अगदी आधुनिक आणि डँशिंग दिसते. गाडीच्या अनेक पार्ट्स हे हाय-टेक आणि स्टायलिश असे आहेत. पुढच्या बाजूस टायगर फेस डिझाइन, तसेच इनटेक ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स यामुळे गाडी पुढून पाहता क्षणी कोणाचंही लक्ष वेधून घेते. गाडीच्या इंजिनचा विचार करता कारन्स 1.4 टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय असतील. डिझेल 1.5 लीटर आणि पेट्रोल 1.5 लीटर अशा दोन पर्यांयामधील कारमध्ये पेट्रोल 1.5 लीटर 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिकसह येईल. तर डिझेल मॅन्युअल किंवा टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक अशा प्रकारात उपलब्ध असणार आहे. कारच्या आतमध्ये अगदी आरामदायी आणि उत्तम असं इंटिरियर डिझाईन असल्याने आतमध्ये बसण्याचा अनुभव उत्तम आहे. दरम्यान गाडीची पहिली झलक जगभरातील ग्राहकांना नुकतीच दाखवण्यात आली असून येत्या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनी गाडी लॉन्च करुन किंमत आणि इतर गोष्टी रिव्हील करणार आहे.
हे ही वाचा
- दोन मिनिटांत 120 बाईक्सची विक्री, Royal Enfield चं वेड कायम
- Audi A4 Premium : ऑडी इंडियाची नवी घोषणा, 'ए४ प्रीमियम' लवकरच लाँच करणार
- Mercedes AMG A 45 S : स्पोर्टस कारला टक्कर देणारी 'Mercedes AMG A 45'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement