Keeway K-Light 250V क्रूझर बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Keeway K-Light 250V: हंगेरियन दुचाकी उत्पादक कंपनी Keeway ने आपली नवीन 2022 Keeway K-Light 250V बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
Keeway K-Light 250V: हंगेरियन दुचाकी उत्पादक कंपनी Keeway ने आपली नवीन 2022 Keeway K-Light 250V बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. याची प्रारंभिक किंमत 2.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. व्ही-ट्विन इंजिनसह क्वार्टर-लिटर सेगमेंटमधील ही भारतातील पहिली क्रूझर बाईक आहे. या बाईकबाबत माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, 249 सीसी इंजिन असलेल्या क्रूझर बाईकची डिलिव्हरी जुलै 2022 च्या मध्यापासून सुरू होईल. चला तर या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
भारतात विक्री होत असलेल्या इतर 250cc बाईकच्या तुलनेत Keeway K-Light 250V डिझाइन खूपच वेगळी आहे. याच्या पुढील बाजूस गोलाकार एलईडी डीआरएलसह अंडाकृती आकाराचा ऑल-एलईडी हेडलॅम्प आणि टर्न इंडिकेटरसह हँडलबार मिळतो. या बाईकला आठ-स्पोक अलॉय व्हील, एक मस्क्यूलर फ्युएल टँक, स्कूप्ड रायडर सीट, फॉरवर्ड-सेट फूटपेग्स, ड्युअल एक्झॉस्ट आणि एलईडी टेललॅम्प मिळतात. ही बाईक मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट डार्क ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
इंजिन
नवीन Keeway K-Light 250V Cruiser मध्ये 249cc, V-twin, 4-वाल्व, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. व्ही-ट्विन इंजिन मिळवणारी ही भारतातील पहिली आणि सध्याची एकमेव क्वार्टर-लिटर क्रूझर बाईक आहे. ही मोटर 8,500 RPM वर 18.7 hp ची पॉवर आणि 5,500 RPM वर 19 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बेल्ट ड्राइव्ह सिस्टीमसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये इंजिन जोडले जाईल. Keeway K-Light 250V च्या समोरील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन हायड्रॉलिक शॉक Absorber मिळतो. ब्रेकिंगसाठी क्रूझरला ड्युअल चॅनल ABS सह दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक मिळतात. या बाईकमध्ये 16-इंच ट्यूबलेस टायर दिले आहेत. कंपनीने या बाईकमध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :