जबरदस्त आहे नवीन हेक्टरचे इंटीरिअर, टिझर लॉन्च
MG Hector 2022 : एमजी मोटर इंडिया लवकरच लॉन्च करण्यात येणाऱ्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचा आणखी एका टिझर सादर केला. 'सिम्फनी ऑफ लक्झरी' म्हणून संकल्पना करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे इंटीरिअर सिनेमॅटिक व सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले आहे.
MG Hector 2022 : एमजी मोटर इंडिया लवकरच लॉन्च करण्यात येणाऱ्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचा आणखी एका टिझर सादर केला. 'सिम्फनी ऑफ लक्झरी' म्हणून संकल्पना करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे इंटीरिअर सिनेमॅटिक व सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले आहे. यामधील संपूर्ण डिझाईन ही हाताने करण्यात आली आहे. यात सॉफ्ट-टच टॅक्टाइल आणि इतर अनेक गोष्टीचा समावेश आहे. याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेऊ.
ड्युअल टोन ओक व्हाइट अॅण्ड ब्लॅक इंटीरिअरसह संपन्न ब्रश्ड मेटल फिनिश नेक्स्ट-जनरेशन हेक्टरच्या केबिनमध्ये आलिशान सुविधांचा अनुभव ग्राहकांना मिळणार आहे. यात लेदर कव्हरिंगसह नवीन इन्स्ट्रूमेंट पॅनेल आडव्या लाइन्ससह डिझाइन करण्यात आले आहे आणि डोअर पॅनेलपर्यंत जात विंग्सपॅनच्या भोवती फ्रण्ट केबिन जागा आहे. एसी वेण्ट्सवरील क्रोम ट्रिम नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये देण्यात आल्याने ही अधिक आकर्षक वाटते
इंटेलिजण्ट व वैयक्तिकृत इंटरअॅक्शन देण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या 14 इंच एचडी पोर्ट्रेट इन्फोटेन्मेंट सिस्टिमला नेक्स्ट-जनरेशन आय-स्मार्ट तंत्रज्ञान देण्यात आले आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अतिरिक्त सोयीसुविधेसाठी वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कार प्ले देखील असेल आणि फुल डिजिटल 7 इंच कॉन्फिग्युरेबल क्लस्टर व्यापक फिल्ड ऑफ व्हिजन व व्हर्च्युअल डिस्प्ले देखील ग्राहकांना मिळणार आहे.
दरवाजे आणि एसी व्हेंट्सना क्रोम ट्रिम मिळते ज्यामुळे याला एक प्रीमियम लूक मिळतो. यात इन्फोटेनमेंटसह, नवीन पिढीचे आय-स्मार्ट तंत्रज्ञान दिले जाईल जे पूर्वीपेक्षा चांगला अनुभव देणार आहे. यासोबतच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले देण्यात येणार आहे. याला 7-इंचाचा क्लस्टर दिला जाणार आहे , जो चांगला लूक देतो. याशिवाय यात 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, चार-मार्गी इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल पॉइंट्ससह को-ड्रायव्हर सीटर आणि 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, कीलेस एंट्री आणि आठ-स्पीकर ऑडिओ सिस्टम मिळू शकते.
नवीन हेक्टरला नवीन लोखंडी जाळी मिळेल, नवीन लोखंडी जाळीचे डिझाइन आर्गील-प्रेरित डायमंड मेश ग्रिल म्हणून ठेवण्यात आले आहे. MG Hector SUV दिवाळीत लॉन्च केली जाऊ शकते. ही 2.0-लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित असेल. तसेच 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाईल. जे 143 bhp पॉवर जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सच्या पर्यायासह ऑफर केले जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंगची चिंता विसरा, 500 ठिकाणी सुरु होणार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन
Airbag Feature Cars in India : देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; जाणून घ्या कारण