एक्स्प्लोर
Advertisement
जुलै महिन्यात दुचाकी विक्रीत घट, व्यावसायिक वाहनांची निर्यातही घटली
July Vehicle Sales Report: दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या बजाज ऑटोने गेल्या जुलै महिन्यातील विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे.
July Vehicle Sales Report: दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या बजाज ऑटोने गेल्या जुलै महिन्यातील विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. बजाजने जुलै 2022 मध्ये 3,54,670 वाहनांची किरकोळ विक्री केली आहे. गेल्या वर्षी या महिन्यात कंपनीने 3,69,116 बाईकची विक्री केली होती. कंपनीच्या विक्रीत वार्षिक 4 टक्क्यांनी घट झाली आहे.
बजाजच्या दुचाकींच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने गेल्या महिन्यात 3,15,054 दुचाकी वाहनांची विक्री केली. यामध्ये देशांतर्गत विक्री आणि निर्यात या दोन्हींचा समावेश होतो. ही विक्री जुलै 2021 च्या विक्रीपेक्षा 5 टक्क्यांनी कमी होती. कंपनीने जुलै 2021 मध्ये 3,30,569 दुचाकींची विक्री केली होती.
देशांतर्गत बाजारात कंपनीची दुचाकी विक्री जुलै 2021 मध्ये 1,56,232 युनिट्सवरून 5 टक्क्यांनी वाढून 1,64,384 युनिट्सवर पोहोचली आहे. मात्र गेल्या महिन्यात कंपनीला दुचाकींच्या निर्यातीत तोटा सहन करावा लागला. कंपनीने जुलै 2022 मध्ये 1,50,670 दुचाकी वाहनांची निर्यात केली. जी मागील वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या 1,74,337 युनिट्सच्या तुलनेत 14 टक्क्यांनी कमी आहे.
व्यावसायिक वाहनांची निर्यात घटली
कंपनीने गेल्या महिन्यात 39,616 व्यावसायिक वाहनांच्या विक्रीसह 3 टक्क्यांची वाढ नोंदवली. जुलै 2021 मध्ये व्यावसायिक वाहनांची 38,547 युनिट्स विकली गेली. देशांतर्गत बाजारपेठेत व्यावसायिक वाहनांची विक्री 68 टक्क्यांनी वाढून 18,572 युनिट्सवर पोहोचली, तर व्यावसायिक वाहनांची निर्यात जुलै 2022 मध्ये 23 टक्क्यांनी घसरून 21,044 युनिट्सवर गेली.
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन सेग्मेंटमध्ये बाजारात आपली पकड निर्माण करण्यासाठी बजाजने पुण्यात नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. हा तोच प्लांट आहे जिथे कंपनी पूर्वी पेट्रोलवर चालणारी चेतक स्कूटर तयार करत होती. बजाजचा नवीन प्लांट 300 कोटी रुपये खर्च करून बांधला जात आहे. बजाजला या प्लांटमध्ये वर्षाला 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करायचे आहे. यामध्येच कंपनी चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन चेतक सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक रेंजआणि अधिक चार्जिंग पर्यायांसह येईल. बजाज चेतक 3kWh IP67 रेटिंग लिथियम-आयन बॅटरीसह 3.8kW इलेक्ट्रिक मोटरसह येते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement