Car Crash Test : कशी केली जाते कार 'क्रॅश टेस्ट'? सेफ्टी रेटिंग म्हणजे काय? वाचा सविस्तर माहिती
तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबियांसाठी कार (Car) खरेदी करण्यापूर्वी इतर फीचर्ससह कारच्या सेफ्टी फीचर्सकडेही बारकाईने लक्ष देत असालाच. रस्ते अपघातात (Road Accident) दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो
![Car Crash Test : कशी केली जाते कार 'क्रॅश टेस्ट'? सेफ्टी रेटिंग म्हणजे काय? वाचा सविस्तर माहिती How car crash test performed? What is Safety Rating? Read detailed information Car Crash Test : कशी केली जाते कार 'क्रॅश टेस्ट'? सेफ्टी रेटिंग म्हणजे काय? वाचा सविस्तर माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/26/b3d468eeffe70c72203dac3b0bf06d94_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Car Crash Test : तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबियांसाठी कार खरेदी करण्यापूर्वी इतर फीचर्ससह कारच्या सेफ्टी फीचर्सकडेही बारकाईने लक्ष देत असालाच. रस्ते अपघातात दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, अशा परिस्थितीत आपल्या सुरक्षिततेबद्दल जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामध्येच तुम्ही कारच्या क्रॅश टेस्ट बद्दल ऐकलं असेलच. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून या टेस्टबद्दल माहिती सांगणार आहोत. ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामद्वारे (GNCAP) कारची क्रॅश टेस्ट केली जाते. या टेस्टनंतर कारला सेफ्टी रेटिंग दिली जाते. या टेस्टमुळे वाहनांची सुरक्षितता सहज कळते. चला तर या टेस्टबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
काय असते सेफ्टी रेटिंग?
न्यू कार असेसमेंट प्रोग्रामद्वारे (Global New Car Assessment Programme) कारचे क्रॅश टेस्ट केले जाते. कार क्रॅश झाल्यानंतर कारचे एअरबॅग, ईबीडी, स्पीड अलर्ट आणि सेफ्टी बेल्ट सारखे फीचर्स चेक केले जातात. त्याआधारे कारची सेफ्टी रेटिंग ठरवली जाते. ही रेटिंग कारचे क्रॅश टेस्ट झाल्यानंतर जारी केली जाते.
कशी केली जाते क्रॅश टेस्ट?
क्रॅशच्या वेळी कारच्या आतील सीटवर एक डमी ठेवली जाते. यानंतर भरधाव वेगाने कार एखाद्या कठीण वस्तूवर आदळते. कारमधील सीटनुसार चार ते पाच डमी किंवा त्यापेक्षा कमी डमीही यात बसवले जातात. यामध्ये, मुलाची डमी देखील मागील सीटवर ठेवली जाते. ज्यावरून कारमधील मुलांची सुरक्षा तपासली जाते.
कसे केले जाते विश्लेषण?
कार क्रॅश झाल्यानंतर टक्कर होताच लगेचच एअरबॅग उघडली की नाही? हे तपासले जाते. डमी पाहून त्याच्या नुकसानीचा अंदाज येतो. तसेच कारचे इतर सुरक्षा फीचर्सही तपासली जातात. या फीचर्समुळे प्रवाशांचे किती संरक्षण केले जाते, हे पाहण्यात येते. अनेक महत्त्वाच्या मुद्यांच्या आधारे कारचे रेटिंग ठरवले जाते.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)