हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर 7 ऑक्टोबरला होणार लॉन्च , मिळणार हे फीचर्स
Hero Eectric Scooter: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे.
Hero Eectric Scooter: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही स्कूटर 7 ऑक्टोबर 2022 रोजी लॉन्च करणार आहे. हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नवीन विडा सब-ब्रँडच्या नावाने बाजारात उतरवण्यात येणार हे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत येत्या काही आठवड्यात समोर येईल. मात्र याची किंमत सुमारे 1 लाख रुपये असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनीने आधीच आपल्या डीलर्स, गुंतवणूकदारांना आणि जागतिक वितरकांना लॉन्चसाठी आमंत्रणे पाठवली आहेत. हा लॉन्च कार्यक्रम राजस्थानची राजधानी जयपूर येथे होणार आहे.
नवीन विडा उप-ब्रँड 1 जुलै 2021 रोजी सादर करण्यात आला होता. आत्तापर्यंत आगामी Hero इलेक्ट्रिक स्कूटरची फीचर्स उघड करण्यात आलेली नाहीत. तत्पूर्वी, Hero MotoCorp ने देशात ईव्ही आणि बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क विकसित करण्यासाठी तैवान-आधारित फर्म गोगोरोसोबत आपली धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. गोगोरो सध्या त्याच्या 2,000 बॅटरी स्वॅपिंग पॉइंट्सद्वारे 3,75,000 रायडर्सना सेवा देते.
भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर Hero ची इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube, Bajaj Chetak आणि त्याच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा karel. यापूर्वी, ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्च 2022 मध्ये लॉन्च होणार होती. मात्र पुरवठा साखळी आणि विविध घटकांच्या अभावामुळे विलंब झाला. Hero ची नवीन ई-स्कूटर जयपूरमधील R&D हब सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (CIT) येथे विकसित केली गेली आहे. ही स्कूटर कंपनीच्या आंध्र प्रदेशातील प्लांटमध्ये तयार केली जाईल.
हिरो दोन नवीन बाईकवर काम करत आहे
दरम्यान, Hero दोन नवीन 300cc बाईक्सवर देखील काम करत आहे. Xtreme S आणि XPulse ची चाचणी करत आहे. दोन्ही बाईक ऑल-न्यू प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत आणि हाय पॉवर आउटपुटसाठी 300cc इंजिन वापरण्यात आले आहे. Hero Xtreme S ही पूर्णपणे फेअर बाईक असेल. तर Xpulse ही नवीन ऍडव्हेंचर बाईक असेल. चाचणी दरम्यान दिसलेल्या मॉडेल्सना पेटल डिस्क, रेड ट्रेलीस फ्रेम, क्लच कव्हर, क्रोम फिनिश साइड स्टँड आणि स्विंगआर्मसह फ्रंट स्पोक व्हील असल्याचे पाहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या :