(Source: Poll of Polls)
Harley Davidson X440 : हार्ले-डेविडसनची सर्वात स्वस्त बाईक! Royal Enfield ला टक्कर, मेड-इन-इंडिया बाईकची किंमत माहितीय?
Harley-Davidson X440 Rival : नवीन दमदार हार्ले-डेविडसन X440 ची टक्कर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि होंडा H’ness CB350 या बाईकसोबत केली जात आहे.
Harley Davidson X440 : हार्ले-डेविडसनची सर्वात स्वस्त बाईक (Harley Davidson Cheapest Bike) लाँच झाली आहे. नवीन दमदार हार्ले-डेविडसन X440 (Harley Davidson X440) भारतीय बाजारात दाखल झाली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी नवीन हार्ले डेव्हिडसन बाईक लाँच झाली आहे. या बाईकची किंमत 2.29 लाख रुपयांपासून सुरु होते. नवीन दमदार हार्ले-डेविडसन X440 ची टक्कर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) आणि होंडा H’ness CB350 (Honda H'ness CB 350) या बाईकसोबत केली जात आहे.
हार्ले-डेविडसनची सर्वास स्वस्त बाईक
हार्ले डेव्हिडसन कंपनीने ही बाईक फक्त 2.29 लाख रुपयांच्या किंमतीपासून लाँच केली आहे. याच्या टॉप मॉडेलची किंमत 2.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. बाइक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते, यासाठी तुम्हाला 25,000 रुपये बुकिंग रक्कम जमा करावी लागेल. Harley-Davidson X440 चं स्टाइलिंग आणि डिझायनिंग Harley-Davidson ने केलं आहे, तर बाईक बनवण्याचं काम हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने केलं आहे. हार्ले डेव्हिडसनने बनवलेली ही सर्वात स्वस्त बाईक आहे, जी पूर्णपणे मेड-इन इंडिया बनलेली आहे.
Harley-Davidson ची भारतात तयार झालेली पहिली बाईक
Harley-Davidson ची ही पहिली बाईक आहे, जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. याशिवाय, हार्ले-डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या भागीदारीत तयार केलेलं हे पहिलं मॉडेल आहे. Harley-Davidson X440 बाईकचा लूक खूपच स्पोर्टी आहे.
हार्ले-डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्पची भागीदारी
Harley-Davidson X440 बाइकच्या स्टाइलिंगचं काम हार्ले-डेव्हिडसनने केलं आहे, तर इंजिनिअरिंग, चाचणी आणि संपूर्ण बाईक तयार करण्याची जबाबदारी हिरो मोटोकॉर्पची आहे. Harley-Davidson X440 ला आधुनिक-रेट्रो लूक देण्यात आला आहे. या बाईकमध्ये नवीन 440cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं असून हे 27hp पॉवर आणि 38Nm टॉर्क जनरेट करते.
Harley-Davidson X440 बाईकची खासियत
ही बाईक क्रूझरप्रमाणे कोणत्याही फॉरवर्ड-सेट फूटपेगशिवाय किंवा स्वीप्ट बॅक हँडलबारशिवाय ऑफर केली जाते. या बाइकमध्ये मिड-सेट फूटपेग आणि फ्लॅट हँडलबार दिला आहे. त्याची रेट्रो-स्टाईल गोल हेडलाइट, मध्यभागी एलईडी डीआरएल बार आणि वर एक गोल स्पीडो, मस्क्यूलर फ्युल टँक टाकी आणि रुंद हँडलबार हार्ले-डेव्हिडसन नाईटस्टरसारखे दिसतात. गोल आकाराचे इंडिकेटर आणि आरसे आणि अंडाकृती आकाराचे टेल लॅम्प आहेत. नवीन हार्ले-डेव्हिडसन बाइकला दोन्ही बाजूला जाड ग्रॅब रेलसह सिंगल स्टेप सीट मिळते. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि TFT डिस्प्लेसह इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
Harley-Davidson X440 मॉडेल आणि किंमत
- व्हेरिएंटची किंमत (एक्स-शोरूम)
- X440 Denim : 2.29 लाख रुपये
- X440 Vivid : 2.49 लाख रुपये
- X440 S : 2.69 लाख रुपये
संबंधित इतर बातम्या :