(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OLA Electric Scooter ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता App ने लॉक करता येईल स्कूटर
OLA Electric: ओला इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच आपल्या S1 आणि S1 Pro या दोन्ही ई-स्कूटर्ससाठी नवीन MoveOS 2 अपडेट आणण्यासाठी सज्ज आहे
OLA Electric: ओला इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच आपल्या S1 आणि S1 Pro या दोन्ही ई-स्कूटर्ससाठी नवीन MoveOS 2 अपडेट आणण्यासाठी सज्ज आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ई-स्कूटर लॉन्च केल्यानंतर हे पहिले मोठे OTA (ओव्हर-द-एअर) अपडेट कंपनी आपल्या स्कूटरमध्ये देणार आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कोणते नवीन अपडेट आणणार आहेत, हे दाखवले आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना अग्रवाल यांनी लिहिले, "आमच्याकडे MoveOS 2 साठी ओला इलेक्ट्रिक अॅप तयार आहे.'' हे अॅप एप्रिलच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे.
अॅपद्वारे लॉक केली जाऊ शकते स्कूटर
ओला इलेक्ट्रिक अॅपचे नवीन ओटीए अपडेट खूपच जबरदस्त आहे. अपडेट रोल आउट झाल्यानंतर लॉक फीचर्स सक्रिय केले जाणार आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून स्कूटर सहजपणे लॉक आणि अनलॉक करू शकाल. नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोल यासारख्या फीचर्सचा देखील समावेश असणार आहे. ज्याचा उद्देश रायडर्सचा प्रवास सुरळीत करणे हा आहे.
MoveOS 2 मध्ये एक नवीन राइड मोड देखील ग्राहकांना मिळणार आहे. ज्याला 'इको मोड' असे नाव देण्यात आले आहे. अग्रवाल यांच्या मते, जर ही इलेक्ट्रिक स्कूटर 45 किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी वेगाने चालवली गेली, तर ती एका चार्जवर सुमारे 170 किमीची रेंज देऊ शकेल. OS अपडेट करण्याव्यतिरिक्त S1 ट्रिममध्ये असे फीचर्स मिळतील, जे आधी फक्त याच्या टॉप व्हेरियंट S1 Pro मध्ये उपलब्ध होती.
महत्वाच्या बातम्या :