![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: Poll of Polls)
CNG Car Under 10 Lakh: स्वस्तात होणार मस्त प्रवास! 10 लाखांच्या बजेटमध्ये येतात 'या' आलिशान सीएनजी कार
Hatchback CNG Cars: भारतीय कार बाजारात सीएनजी (CNG Cars) आणि इलेक्ट्रिक कारची (EV) मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक सतत त्यांच्या कारचे पेट्रोल व्हेरियंट आता सीएनजीसह अपडेट करून लॉन्च करत आहेत.
![CNG Car Under 10 Lakh: स्वस्तात होणार मस्त प्रवास! 10 लाखांच्या बजेटमध्ये येतात 'या' आलिशान सीएनजी कार CNG Car Under 10 Lakh These luxury CNG cars come in a budget of 10 lakhs Tata Tiago NRG iCNG marathi auto news CNG Car Under 10 Lakh: स्वस्तात होणार मस्त प्रवास! 10 लाखांच्या बजेटमध्ये येतात 'या' आलिशान सीएनजी कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/1ac4d13d04ff4383235b66d77762ad69_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hatchback CNG Cars: भारतीय कार बाजारात सीएनजी (CNG Cars) आणि इलेक्ट्रिक कारची (EV) मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक सतत त्यांच्या कारचे पेट्रोल व्हेरियंट आता सीएनजीसह अपडेट करून लॉन्च करत आहेत. अशातच तुम्हीही सीएनजी कारचा पर्याय शोधत असाल तर. तर इथे आम्ही तुम्हाला काही चांगले पर्याय सांगत आहोत. ज्याचा तुम्ही विचार करू शकता. चाल तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या सीएनजी कार्स...
टाटा टियागो NRG iCNG (Tata Tiago NRG iCNG)
ही टाटा कार सीएनजी प्रकारात 26.49 किमी प्रति किलोपर्यंत अंतर कापण्यास सक्षम आहे. डिझाईनमध्ये 15-इंचाच्या अलॉय व्हील्स व्यतिरिक्त स्कल्प्टेड बोनेट, स्लीक ग्रिल, स्किड प्लेट्स, रूफ रेल्स, रॅप-अराउंड टेललाइट्स आणि डिझायनर कव्हर्स आहेत. याच्या इंटिरिअरमध्ये ऑल-ब्लॅक डॅशबोर्ड, प्रीमियम फॅब्रिक अपहोल्स्ट्री, हरमन साउंड सिस्टम आणि ड्युअल एअरबॅग्ज यांचा समावेश आहे. ही कार 1.2L एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 73hp/95Nm पॉवर जनरेट करते. या कारची किंमत 7.4 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी (Maruti Suzuki Swift CNG)
मारुतीने नुकतीच सीएनजी प्रकारात आपली नवीन स्विफ्ट सादर केली आहे. या कारमध्ये तुम्हाला एलईडी फॉग लॅम्प्स, डेटाइम रनिंग लाइट्स, प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एलईडी टेल लॅम्प्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार 1.2-L चार सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे के-सिरीजचे ड्युअल-जेट इंजिन आहे. ही कार प्रति किलो सीएनजी 30.90 किमी पर्यंत अंतर कापू शकते. याची किंमत 7.7 लाख रुपयांपासून सुरू होते.
टोयोटा ग्लान्झा CNG (Toyota Glanza CNG)
टोयोटा ग्लान्झा कार ही मारुतीच्या बलेनो कारची रिबॅज केलेलं व्हर्जन आहे. याच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. टोयोटा ग्लान्झा सीएनजी नोव्हेंबरमध्ये बाजारात दाखल झाली होती. याच्या 5-सीटर केबिनला फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 9-इंचाची टचस्क्रीन प्रणाली मिळते. ही कार प्रति किलो सीएनजी 30.61 किमी अंतर कापण्यास सक्षम आहे. याची किंमत 8.43 लाख रुपयांपासून सुरू होते.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)