Electric Moped Bike: 'ही' इलेक्ट्रिक मोपेड चालवण्यासाठी 'ड्रायव्हिंग लायसन्स;ची गरज नाही, देते 55 किमीची रेंज; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Electric Moped BikElectric Moped Bike: इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्माता कंपनी Polestar ने स्वीडिश दुचाकी निर्माता कंपनी केकच्या सहकार्याने केक मक्का (Cake Makka) ही नवीन इलेक्ट्रिक मोपेड लॉन्च केली आहे.e: इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्माता कंपनी Polestar ने स्वीडिश दुचाकी निर्माता कंपनी केकच्या सहकार्याने केक मक्का (Cake Makka) ही नवीन इलेक्ट्रिक मोपेड लॉन्च केली आहे.
Electric Moped Bike: इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्माता कंपनी Polestar ने स्वीडिश दुचाकी निर्माता कंपनी केकच्या सहकार्याने केक मक्का (Cake Makka) ही नवीन इलेक्ट्रिक मोपेड लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक मोपेड लहान आणि आकाराने हलकी आहे. ज्यामुळे ही गर्दीतही सहज चालवता येते. केक मक्का मोपेडबद्दल (Cake Makka) सांगायचे तर, कंपनीने ही शहरांमध्ये वापरण्यासाठी डिझाइन केली आहे. ही मोपेड शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कार्यालयात जाणारे प्रोफेशनल व्यक्तीही वापरू शकतात.
Electric Moped Bike: ही मोपेड चालवणयातही 'ड्रायव्हिंग लायसन्स'ची गरज नाही
सध्या ही मोपेड युरोपच्या बाजारपेठेपुरती मर्यादित असून भारतात ही लॉन्च होण्याची शक्यता खूपच कमी आहे. या मोपेडचा टॉप स्पीड 45 किमी/तास आहे. युरोपमध्ये ही मोपेड चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरटीओ नोंदणी आवश्यक नाही. याच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर, याची डिझाइन सिम्पल आणि वजनाने हलके ठेवण्यासाठी त्यात फार कमी भाग वापरले गेले आहेत. हे मोपेड पाईप फ्रेमवर बांधलेले आहे. आरामदायी राईडसाठी, याला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक युनिट मिळते. ब्रेकिंग सुधारण्यासाठी या मोपेडमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक देखील आहे.
हे मोपेड काढता येण्याजोग्या बॅटरीने सुसज्ज आहे. म्हणजेच चार्जिंगची आवश्यकता असल्यास मोपेडमधून बॅटरी काढून चार्ज करता येते. यात 1.55 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आहे. जी मागील हब माउंट केलेली आहे. ही मोटर 2.8 kW ची पॉवर देते. यामध्ये कंपनीने कॉम्पॅक्ट लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तास घेते. ही मोपेड पूर्ण चार्ज केल्यावर 55 किमीची रेंज देते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी याची किंमत 5,300 डॉलर्स इतकी ठेवली आहे. भारतात लॉन्च झाल्यावर याची किंमत सुमारे 4.38 लाख रुपये असेल.
E-Motorad फोल्डिंग इलेक्ट्रिक सायकल
दरम्यान, E-Motorad ने अलीकडेच आपली नवीन फोल्डेबल ई-सायकल डूडल V2 भारतात लॉन्च केली आहे. ही एक फॅट टायर सायकल आहे. जी 49,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक सायकल कंपनीच्या वेबसाइटवरून तसेच Amazon, Flipkart, Croma आणि ऑफलाइन डीलरशिपवरून खरेदी केली जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की, फक्त 1 रुपयाच्या खर्चात 25 किमी धावू शकते. यात 24 Ah ची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ही फक्त बॅटरीच्या पॉवरवर 55 ते 60 किलोमीटर धावू शकते, असा दावाही कंपनीने केला आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: