Bugatti Chiron Sport Car: बुगाटीने आपल्या शेवटच्या पेट्रोल कारचा केला लिलाव, तब्बल इतक्या कोटींना कार विकून केला विश्वविक्रम
Bugatti Chiron : सुपरकार निर्माता बुगाटीने आपल्या स्पोर्ट्स कारची शेवटची पूर्णपणे पेट्रोल इंजिन असलेली कार बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) देखील विकली. या कारच्या खरेदीची जी बोली लागली, ती विश्वविक्रमी ठरली आहे.
Bugatti Chiron : एकापाठोपाठ एक कार निर्माते त्यांचे पारंपारिक वाहन मॉडेल बंद किंवा ग्रीन फ्यूल इंजिनसह अपडेट करण्यात व्यस्त आहेत. जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करता येईल. यामुळे सुपरकार निर्माता बुगाटीने आपल्या स्पोर्ट्स कारची शेवटची पूर्णपणे पेट्रोल इंजिन असलेली कार बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) देखील विकली. या कारच्या खरेदीची जी बोली लागली, ती विश्वविक्रमी ठरली आहे.
Bugatti Chiron Last Petrol Variant Highest Value Auction record : किती कोटींची लागली बोली?
बुगाटीच्या बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) लक्झरी स्पोर्ट्स कारच्या शेवटच्या पेट्रोल मॉडेल खरेदीसाठी सुमारे 78 कोटी रुपयांची (9.5 मिलियन डॉलर्स) बोली लावली आहे. जी कोणत्याही कार लिलावासाठी आतापर्यंतची सर्वाधिक बोली होती. परंतु या कारच्या शौकीन व्यक्तींमुळे कारसाठी शेवटची बोली सोडून कंपनीला सुमारे 88.23 कोटी रुपये (10.7 मिलियन डॉलर्स ) अतिरिक्त नफा मिळाला.
Bugatti Chiron Last Petrol Variant Highest Value Auction record : बुगाटी चिरॉन फीचर्स
बुगाटीचे हे स्पोर्ट्स मॉडेल कंपनीचे सर्वात हाय स्पीड मॉडेल आहे. ज्याची टॉप स्पीड 378 किमी/तास आहे. कार फक्त 2.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडू शकते आणि 200 किमी/ताशी वेग गाठण्यासाठी या कराल फक्त 5.5 सेकंद लागतात. त्याचबरोबर ही कार ताशी 378 किलोमीटर वेगानेही धावू शकते.
Bugatti Chiron Last Petrol Variant Highest Value Auction record : बुगाटी चिरॉन लूक
बुगाटीच्या बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) कारमध्ये कंपनीची 114 वर्षे जुनी झलक पाहायला मिळते. अर्जेंटिना अटलांटिक रंगात सादर केलेली ही कार वेगळ्या रूपात दिसते. जी तिच्या इतर कोणत्याही मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्याचबरोबर या कारचा खालचा भाग कार्बन फायबर आणि ब्लू रॉयल कार्बन कलरमध्ये खास डिझाईनसह सादर करण्यात आला आहे, ज्यामुळे याला वेगळा लूक मिळतो.
जगातील सर्वात महागडी कार, किंमत तब्बल 200 कोटी
रोल्स-रॉइस बोट टेल (Rolls-Royce Boat Tail) ही जगातील सर्वात महागडी लक्झरी कार आहे. या कारची किंमत सुमारे 206 कोटी रुपये आहे. ही फोर सीटर लक्झरी कार आहे. ही 6 मीटर लांबीची ग्रँड टूरर कार आहे. यामध्ये कॅनोपी रूफसह मागील बाजूस होस्टिंग सूटची सुविधा उपलब्ध आहे. जबरदस्त लक्झरी फीचर्ससह ही कार मर्यादित युनिट्ससह उपलब्ध आहे. सध्या याचे फक्त तीन युनिट झाले आहेत. त्याचबरोबर या आलिशान कारमध्ये स्वित्झर्लंडची प्रसिद्ध घड्याळ निर्माता कंपनी हाउस ऑफ बोवेटचे खास घड्याळही देण्यात आले आहे. या लक्झरी कारमध्ये 6.7-L पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे केवळ 5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास क्षमता आहे.