बजेट फ्रेंडली नवीन Passion Xtec बाईक लॉन्च, लूकसह फीचर्सही आहेत दमदार
Hero Passion XTec : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपली लोकप्रिय नवीन Passion 'XTec' लॉन्च केली आहे.

Hero Passion XTec : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपली लोकप्रिय नवीन Passion 'XTec' लॉन्च केली आहे. कंपनीची ही बाईक देशभरातील Hero MotoCorp डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही बाईक ड्रम आणि डिस्क या दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने आजच्या तरुण पिढीला लक्षात घेऊन ही बाईक डिझाइन केली आहे. 110cc Passion XTec बाईक सुविधा, सुरक्षितता आणि उपयुक्तता फीचर्सने लोडेड आहे.
किंमत किती?
कंपनीने Hero Passion XTec च्या ड्रम व्हेरिएंटसाठी 74590 रुपये किंमत ठेवली आहे. तर Hero Passion XTec चा डिस्क व्हेरिएंट 78990 रुपयांना उपलब्ध आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत. Passion XTec पाच वर्षांच्या वॉरंटीसह येते.
लूक आणि डिझाइन
नवीन Passion XTec सर्वोत्तम-इन-सेगमेंट प्रोजेक्टर LED हेडलॅम्प ऑफर करते, जे पारंपारिक हॅलोजन दिव्यांच्या तुलनेत 12 टक्के लांब बीमसह सर्वोत्तम-इन-सेगमेंट ब्राइटनेस देतात. नवीन हेडलॅम्प डिझाइन बाईकची स्पोर्टीनेस आणि एरोडायनॅमिक्स देखील वाढवते. या बाईकमध्ये क्रोमेड 3D ब्रँडिंग आणि रिम टेप आहे, जे याच्या प्रीमियम लूकमध्ये आणखी भर पाडते.
इंजिन आणि पॉवर
नवीन Passion Pro XTec 110cc BS-VI अनुरूप इंजिनसह येते. हे इंजिन 7500 rpm वर 9 bhp चा पॉवर आउटपुट आणि 5000 rpm वर 9.79 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. नवीन Passion Pro XTec जबरदस्त इंधन कार्यक्षमतेसाठी पेटंट i3S तंत्रज्ञानासह येते, ज्यामुळे जास्त मायलेज मिळतो.
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अनेक फीचर्स मिळणार
Passion XTec मध्ये, रायडर वाहन आणि कनेक्टिव्हिटी फंक्शन्स जलद आणि सुलभ वापरू शकतो. ब्लू बॅकलाइटसह सेगमेंट-फर्स्ट फुल डिजिटल स्पीडोमीटर कन्सोल इंटिग्रेटेड USB चार्जिंग पोर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फोन कॉल अलर्ट, मिस्ड कॉल आणि एसएमएस नोटिफिकेशन यासारख्या फीचर्ससह येते. यात रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर आणि सर्व्हिस शेड्यूल रिमाइंडर आणि कमी इंधन इंडिकेटर यासारखी माहिती देखील रायडरला दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
