एकदा चार्ज केल्यावर मुंबईहून थेट गाठता येणार कोल्हापूर; एमजीने लॉन्च केली नवीन इलेक्ट्रिक कार
MG Motors ने आज भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक SUV MG Z EV चा फेसलिफ्ट व्हेरिएंट लॉन्च केला आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर थेट मुंबईहून कोल्हापूर (Mumbai To Kolhapur Distance is 376.5 km) गाठता येणार.
MG Motors ने आज भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक SUV MG Z EV चा फेसलिफ्ट व्हेरिएंट लॉन्च केला आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर थेट मुंबईहून कोल्हापूर (Mumbai To Kolhapur Distance is 376.5 km) गाठता येणे शक्य होणार आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. जे याच्या पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत खूप आधुनिक आहेत. याच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅटरी पॅकला IP69K रेटिंग देण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच यात ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक देखील ग्राहकांना मिळणार आहे. तसेच हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटर सारखे फीचर्स देखील कंपनीने आपल्या या नवीन कारमध्ये दिले आहेत.
फीचर्स
कारमध्ये अँड्रॉइड आणि अॅपल वॉचसाठी आय-स्मार्ट अॅप देण्यात आले आहे. याशिवाय लाइव्ह लोकेशन शेअरिंग आणि ट्रॅकिंग, इकोट्री सिटो सेव्हिंग, कारमधील एसी, ऑडिओ नियंत्रित करण्यासाठी रिमोट, डिजिटल की, ई-कॉल आणि आय-कॉल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय स्कायरूफ, एसी, म्युझिक, रेडिओ आणि नेव्हिगेशन इ. 100 हून अधिक यासाठी व्हीआर कमांड देण्यात आले आहेत. यासोबतच यामध्ये 75 हून अधिक कनेक्टेड फीचर्स देखील देण्यात आले आहेत. तसेच यात फुल एलईडी हॉक-आय हेडलॅम्प आणि एलईडी टेल लॅम्प देण्यात आले आहेत. मनोरंजनासाठी यात 10.1-इंचाचा टच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑटो एसीला पीएम 2.5 फिल्टर देण्यात आला आहे.
एका चारमध्ये गाठते 461 किमी
यात 50.3 kW चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर 461 (Range) किमी धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, याची मोटर 176 पीएस पॉवर जनरेट करते. ही कार फक्त 8.5 सेकंदात 0 ते 100 चा वेग पकडते. कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये ही कार लॉन्च केली आहे. याच्या Excite व्हेरिएंटची किंमत 21,99, 800 रुपये आहे. तर याच्या Exclusive व्हेरिएंटची किंमत 25,88,000 रुपये आहे. ग्राहकांना जुलै महिन्यात ही कार खरेदी करता येईल.
हे देखील वाचा-