(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Year End Offers On Hyundai Cars: डिसेंबर महिन्यात कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करा; ह्युंडाईच्या 'या' कारवर बंपर ऑफर्स
Year End Offers On Hyundai Cars : वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून ऑटोमोबाईल कंपन्यांवर जुने स्टॉक कार विक्री करण्यासाठी प्रचंड दबाव असतो. अशा परिस्थितीत कार कंपन्या इयर एंड ऑफर्स अंतर्गत आपल्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट देत आहे
Year End Offers On Hyundai Cars : वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून ऑटोमोबाईल कंपन्यांवर जुने स्टॉक कार विक्री करण्यासाठी प्रचंड दबाव असतो. अशा परिस्थितीत कार कंपन्या इयर एंड ऑफर्स अंतर्गत आपल्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट देत आहेत. या प्रयत्नात ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या अनेक हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्हीवर डिसेंबर 2023 मध्ये बंपर डिस्काउंट दिला जात आहे आणि जे आजकाल नवीन ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली संधी आहे. चला तर मग तुम्हाला ह्युंडाई कारच्या इयर अँड डिस्काऊंटबद्दल...
Discount on Hyundai cars : कोणत्या कारवर किती सूट ?
-ह्युंडाई ग्रँड आय 10 निओस (Hyundai Grand i10 Nios) - जे लोक या महिन्यात ह्युंडाईची एंट्री लेव्हल हॅचबॅक कार ग्रँड आय 10 निओस खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना 48,000 रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात.
-ह्युंडाई आय 20 (Hyundai i20) (प्री-फेसलिफ्ट मॉडेल) – ह्युंडाईच्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर ग्राहकांना 40 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकतात.
-ह्युंडाई आय 20 (Hyundai i20) - ह्युंडाई आय 20 चे फेसलिफ्ट मॉडेल खरेदी करणाऱ्यांना या महिन्यात 20 हजार रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात.
-ह्युंडाई आय 20 एन-लाइन (Hyundai i20 N-Line) - ह्युंडाईच्या प्रीमियम हॅचबॅक आय 20 चे अधिक स्पोर्टी एन-लाइन व्हेरिएंट खरेदी करणाऱ्यांना या महिन्यात 50,000 रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात.
-ह्युंडाई ऑरा (Hyundai Aura) – ह्युंडाईची एंट्री लेव्हल कॉम्पॅक्ट सिडान ऑरा खरेदी करणाऱ्यांना या एमबीन इयर एंड ऑफर अंतर्गत 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.
-ह्युंडाई वरना (Hyundai Verna) - जर तुम्ही या महिन्यात ह्युंडाई मोटर इंडियाची मिडसाइज सिडान वरना खरेदी केली तर तुम्हाला 45 हजार रुपयांपर्यंत फायदे सूट शकते.
-ह्युंडाई ट्यूसन (Hyundai Tucson)- या महिन्यात ग्राहकांना ह्युंडाईच्या प्रीमियम एसयूव्ही ट्यूसनवर दीड लाख रुपयांपर्यंतचे सूट मिळू शकते.
-ह्युंडाई अल्काझर (Hyundai Alcazar)- ह्युंडाई अल्काझर खरेदी करणाऱ्यांना या महिन्यात 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
ह्युंडाईच्या गाड्यांना सर्वत्र पसंती
भारतात ह्युंडाईच्या गाड्यांना सर्वत्र पसंती मिळाली आहे. त्यामुळे भारतात ह्युंडाई गाड्यांचा खूप मोठ्याप्रमाणात आहे. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारी आणि आलिशान कार अशी ह्युंडाई कारची ओळख भारतीयांच्या मनात आहे. त्यामुळे अनेकांचा कल ह्युंडाई कार खरेदी करण्याकडे पाहायला मिळतो. हीच कार आता स्वस्तात मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी या कारची किंमत वेगळी असण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या भागातील ऑफर्स नक्की चेक करा.
इतर महत्वाची बातमी-