Skoda India ची नवीन SUV मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा; K आणि Q लेटरशी संबंधित असणार 'हे' नाव
Skoda India New Suv : निर्मात्यांनी आणखी एक SUV कार आणण्याबाबत चर्चा केली. ही कार 2025 मध्ये भारतात लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.
Skoda India New Suv : Skoda ने नुकतंच भारतात इलेक्ट्रिक Enyaq SUV लाँच केली आहे. तसेच नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) लाँच करण्याची घोषणा केली आहे. ही नवी कार Skoda Kushaq अंतर्गत लाँच होणार आहे. स्कोडा अशी आणखी एक कार आणणार आहे, ज्याचे मॉडेल चार मीटर लांब असणार आहे. याच्या नवीन मॉडेलचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. पण, कार उत्पादक त्याच्या नवीन मॉडेलच्या नावासाठी मतदान करणार आहेत.
2025 मध्ये लॉन्च होईल
स्कोडा इंडिया भारतात नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक Anyak SUV लाँच करून, निर्मात्यांनी आणखी एक SUV कार आणण्याबाबत चर्चा केली. ही कार 2025 मध्ये भारतात लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. स्कोडाच्या सर्वात स्वस्त कारपैकी ही एक असेल असे बोलले जात आहे.
लांबी चार मीटर असेल
स्कोडाचे हे नवीन मॉडेल चार मीटर लांब असणार आहे. या लांबीचे स्कोडाचे हे दुसरे मॉडेल आहे. यापूर्वी स्कोडाने चार मीटर लांबीची फॅबिया हॅचबॅक बनवली होती. स्कोडाचे हे मॉडेल हॅचबॅकमध्ये नाही, तर एसयूव्हीमध्ये लॉन्च केले जाईल.
हे नवीन SUV चं नाव असणार
स्कोडाने अद्याप आपल्या नवीन मॉडेलचे नाव निश्चित केलेले नाही. पण, नवीन मॉडेलच्या नावासाठी मतदान घेण्यात आले आहे. स्कोडा कंपनीला या नव्या एसयूव्हीच्या नावात K आणि Q अक्षरे समाविष्ट करायची आहेत. कुशक मॉडेलच्या धर्तीवर कंपनीने या नावाचा विचार केला आहे.
कारच्या नावासाठी मतदान
कार कंपनीने नवीन एसयूव्हीसाठी काही नावांची ऑफर दिली आहे. यामध्ये Kwiq, Kymaq, Kylaq, Kariq आणि Kyroq या सर्व नावांचा समावेश आहे. कंपनी नवीन एसयूव्हीच्या नावाबाबत मतदान घेणार आहे. त्यानंतरच कारचे नाव निश्चित होईल असं सांगण्यात येतंय.
अनेक कारशी स्पर्धा करणार
स्कोडाची ही नवी एसयूव्ही अनेक गाड्यांना टक्कर देणार आहे. Tata Nexon, Hyundai Venue आणि Kia Sonet ची नावे या रेंजमध्ये समाविष्ट आहेत. कार निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे या नवीन मॉडेलचे इंजिन Kushaq प्रमाणे टर्बो पेट्रोल 1.0 ने घेतले आहे. तसेच सांगितले की या नवीन SUV मध्ये प्रतिस्पर्धी कारपेक्षा जास्त फीचर्स असतील.
नवीन SUV ची किंमत
स्कोडाच्या कारची किंमत 9 ते 14 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. या कारची किंमत कुशाकच्या किंमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे ही नवीन एसयूव्ही परवडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :