(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मारुती सुझुकीने S-Presso ची किंमत केली कमी; WagonR वर बंपर डिस्काउंटचा आजचा शेवटचा दिवस
Maruti Suzuki S-Presso Price Cut : मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये वॅगनआर (WagonR) पहिल्या स्थानावर कायम आहे.
Maruti Suzuki S-Presso Price Cut : दिग्गज कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स घेऊन येत असते. मारुती सुझुकीने आधीच परवडणाऱ्या कार एस-प्रेसोच्या निवडक व्हेरियंटच्या किमतीत 5,000 रुपयांनी कपात केली आहे. किंमतीत तात्काळ बदल करून, कंपनीने या हॅचबॅकचे VXI O AMT आणि VXI Plus O AMT व्हेरिएंट स्वस्त केले आहेत. आता या दोन व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 5.71 लाख आणि 6 लाख रुपये झाली आहे. इतर कोणत्याही व्हेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल अद्याप करण्यात आलेला नाही. तसेच, मारूती सुझुकीने ज्या कारच्या किंमतीत बदल केले आहेत त्या बदलानंतर, मारुती सुझुकी S-Presso ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे जी टॉप मॉडेलसाठी 6.11 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकीच्या कारबरोबरच आणखी कोणत्या कारवर डिस्काऊंट मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
WagonR वर सुद्धा मिळणार फायदा
मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये वॅगनआर (WagonR) या कारचा क्रमांक पहिल्या स्थानावर आहे. आता कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये या परवडणाऱ्या हॅचबॅकवर जबरदस्त सूट देण्यास सुरुवात केली आहे. मारुती सुझुकीने या कारवर 61,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट सारख्या वेगवेगळ्या ऑफर्सचा समावेश करण्यात आला आहे. याचाच अर्थ जी कार तुम्हाला पूर्वी 5.54 लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होती ती कार आता ग्राहकांना 5 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. या ऑफरमध्ये 35,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 20,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यांचादेखील समावेश आहे.
34 पेक्षा जास्त मायलेज
सध्याची WagonR कार आपल्या तिसऱ्या जनरेशनपर्यंत पोहोचली आहे जी मारुती सुझुकीच्या नवीन Heartect प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या कारमध्ये 1.0-लिटर आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनीने सीएनजी इंजिन असलेली कारही लॉन्च केली आहे जी 1 किलो सीएनजीमध्ये 34.05 किमीपर्यंत मायलेज देते. याशिवाय, पेट्रोल इंजिनसह देखील कंपनीने ग्राहकांना मजबूत मायलेज आणि उत्कृष्ट कामगिरी देते. जर तुम्ही मारुती सुझुकीची ही लोकप्रिय हॅचबॅक या महिन्यात, म्हणजे पुढील तीन दिवसांत खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमची खूप मोठी बचत होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :