(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Audi A8 L मंगळवारी होणार लॉन्च; मर्सिडीज,बीएमडब्ल्यूला देणार टक्कर
Audi Upcoming Cars: ऑडी इंडिया आपली नवीन प्रीमियम लक्झरी सेडान कार 2022 ऑडी ए8 एल फेसलिफ्ट ( 2022 Audi A8 L facelift ) लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Audi Upcoming Cars: ऑडी इंडिया आपली नवीन प्रीमियम लक्झरी सेडान कार 2022 ऑडी ए8 एल फेसलिफ्ट ( 2022 Audi A8 L facelift ) लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. नवीन Audi A8 L कार 12 जुलै रोजी अधिकृतपणे लाँच केली जाईल. यासोबतच याची किंमत देखील जाहीर केली जाईल. ऑडी A8 L, 4-सीटर सेडान कारच्या आतील आणि बाह्य स्वरूपामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतील. भारतात या कारची स्पर्धा मर्सिडीज एस-क्लास (Mercedes S-Class ) आणि BMW 7 करशी होणार आहे.
बुकिंग सुरू
नवीन Audi A8 L ची बुकिंग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाली होती. ग्राहक 10 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह या लक्झरी सेडानची बुकिंग करू शकतात. ऑडी इंडियाने अलीकडेच A8 L फ्लॅगशिप सेडान कारचा टीझर रिलीज केला आहे. यामध्ये कारचा सिल्क लाइट टीझरमध्ये दिसत आहे. जी मागील लाईट बारमध्ये आहे. यासोबतच कंपनीचे सिग्नेचर ओएलईडी लाइट्सही कारमध्ये दिसत आहेत. टीझर पाहिल्यास ही कार अनेक बाबतीत खूपच आधुनिक दिसत आहे.
लूक आणि फीचर्स
केबिन कम्फर्ट आणि ड्राइव्ह क्षमता या महत्त्वाच्या एलिमेंट्सव्यतिरिक्त A8 L खूपच शानदार दिसते. कारच्या पुढील बाजूस एक मोठी लोखंडी जाळी आहे, जी नवीन-शैलीतील मॅट्रिक्स एलईडी टेललाइट्स आणि दोन्ही बाजूंना स्लीक एलईडी लाइट बार्सने जोडलेली आहे. फ्रंट बंपर देखील अपडेट करण्यात आला आहे. आतील बाजूस, इन्फोटेनमेंट स्क्रीन अपडेट केली गेली आहे. तर फोल्डिंग सेंटर कन्सोल टेबल आणि कूलर देखील दिले गेले आहेत. यात ग्राहकांना लक्झरी फीचर्स देखील मिळणार आहेत. ज्यात रियर रिक्लिनर, फूट मसाजर आणि इतर अनेक फीचर्सचा समावेश आहे.
इंजिन
2022 Audi A8 L मध्ये 3.0-लिटर TFSI पेट्रोल इंजिन मिळते. जे 48V सौम्य-हायब्रीड सिस्टम आणि क्वाट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह तंत्रज्ञानाशी जुळलेले आहे. हे इंजिन 340 एचपी पॉवर आणि 540 एनएम टॉर्क जनरेट करते. यासह ड्राइव्ह डायनॅमिक्स आणि एअर सस्पेन्शन सेट-अपमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मारुती घेऊन येत आहे आपली पहिली Electric Car, जाणून घ्या कधी होणार लॉन्च?
- TVS Ronin : दमदार फीचर्स, जबरदस्त रेंजसह जाणून घ्या TVS Ronin चा संपूर्ण रिव्ह्यू
- इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर! राष्ट्रीय महामार्गांवर लवकरच चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन बांधले जाणार