Car Ownership Per Household: भारतात फक्त 7.5% लोकांकडेच कार! गोवा आघाडीवर, महाराष्ट्रात किती टक्के लोकांकडे आहे कार?
Car Ownership Per Household: गोव्यातील जास्तीत जास्त 45.2% लोकांच्या घरात कार आहे. महाराष्ट्रात किती टक्के कुटुंबीयांकडे कार आहे?
Car Ownership Per Household: उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि ते अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आज पुन्हा त्यांच्या एका ट्वीटची चर्चा होत आहे. ज्यामध्ये त्यांनी देशातील कार मालकांची राज्यनिहाय टक्केवारी नमूद करून भारताचा नकाशा शेअर केला आहे. या नकाशात दिलेला डेटा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (National Family Health Survey) 2019-21 अहवालावर आधारित आहे. ज्याच्या आधारावर देशातील (India) एकूण कुटुंबांपैकी 7.5% कुटुंबांकडे एक किंवा दोन कार आहेत. यामध्येच कोणत्या राज्यात किती टक्के लोकांकडे आहे स्वतःची कार हे जाणून घेऊ...
Goa: आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या नकाशात दिसत असलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यातील जास्तीत जास्त 45.2% लोकांच्या घरात कार आहे.
महाराष्ट्र (Maharashtra): या राज्यातील 8.7% कुटुंबांकडे कार आहे.
केरळ (Kerala): या राज्यातील 24.2% कुटुंबांकडे कार आहे.
जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir): या राज्यातील 23.7% कुटुंबांकडे कार आहे.
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh): या राज्यातील 22.1% कुटुंबांकडे कार आहे.
पंजाब (Punjab): या राज्यातील 21.9% कुटुंबांकडे कार आहे.
नागालँड (Nagaland): या राज्यातील 22.3% कुटुंबांकडे कार आहे.
सिक्कीम (Sikkim): या राज्यातील 20.9% कुटुंबांकडे कार आहे.
दिल्ली (Delhi): या राज्यातील 19.4% कुटुंबांकडे कार आहे.
अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh): या राज्यातील 19.3% कुटुंबांकडे कार आहे.
मणिपूर(Manipur): या राज्यातील 17% कुटुंबांकडे कार आहे.
मिझोरम (Mizoram): या राज्यातील 15.5% कुटुंबांकडे कार आहे.
हरियाणा (Haryana): या राज्यातील 15.3% कुटुंबांकडे कार आहे.
मेघालय (Meghalaya): या राज्यातील 12.9% कुटुंबांकडे कार आहे.
उत्तराखंड (Uttarakhand): या राज्यातील 12.7% कुटुंबांकडे कार आहे.
गुजरात (Gujarat): या राज्यातील 10.9% कुटुंबांकडे कार आहे.
कर्नाटक (Karnataka): या राज्यातील 9.1% कुटुंबांकडे कार आहे.
राजस्थान (Rajasthan): या राज्यातील 8.2% कुटुंबांकडे कार आहे.
आसाम: या राज्यातील 8.1% कुटुंबांकडे कार आहे.
तामिळनाडू: या राज्यातील 6.5% कुटुंबांकडे कार आहे.
तेलंगणा: या राज्यातील 6.5% कुटुंबांकडे कार आहे.
उत्तर प्रदेश: या राज्यातील 5.5% कुटुंबांकडे कार आहे.
मध्य प्रदेश: या राज्यातील 5.3% कुटुंबांकडे कार आहे.
त्रिपुरा: या राज्यातील 4.6% कुटुंबांकडे कार आहे.
छत्तीसगड: या राज्यातील 4.3% कुटुंबांकडे कार आहे.
झारखंड: या राज्यातील 4.1% कुटुंबांकडे कार आहे.
पश्चिम बंगाल: या राज्यातील 2.8% कुटुंबांकडे कार आहे.
आंध्र प्रदेश: या राज्यातील 2.8% कुटुंबांकडे कार आहे.
ओडिशा: या राज्यातील 2.7% कुटुंबांकडे कार आहे.
बिहार: या राज्यातील 2% कुटुंबांकडे कार आहे.