Top 8 Safest Cars: 'या' आहेत भारतातील 8 सर्वात सुरक्षित कार, ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5-स्टार रेटिंग
5-Star Safety Ratings Cars: कार सेफ्टी फीचर्स आता भारतातील लोकांसाठी अधिक महत्त्वाचे पॅरामीटर बनले आहेत आणि ग्लोबल NCAP रेटिंग्स हाय परफॉर्मन्स असणाऱ्या कार किती सुरक्षित आहेत याची टेस्ट करतात.
5-Star Safety Ratings Cars: कार सेफ्टी फीचर्स आता भारतातील लोकांसाठी अधिक महत्त्वाचे पॅरामीटर बनले आहेत आणि ग्लोबल NCAP रेटिंग्स हाय परफॉर्मन्स असणाऱ्या कार किती सुरक्षित आहेत याची टेस्ट करतात. तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सेफ्टी फीचर्स लक्षात घेऊनच कर खरेदी करा. याच्याशी संबंधित आज आम्ही तुम्हाला देशातील आठ सुरक्षित गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग मिळाली आहे. जाणून घेऊ या लिस्टमध्ये कोणत्या कारचा समावेश आहे...
फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कुशाक / Volkswagen Taigun/Skoda Kushaq
फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कुशाक यांना ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ व्यक्तींच्या सेफ्टीसाठी (29.64/34) आणि लहान चाईल्ड सेफ्टीसाठी (42/49) गुणांसह 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या दोन्ही एसयूव्ही कारचे बॉडीशेल्स अतिशय मजबूत असल्याचे आढळून आले. यात ड्युअल एअरबॅग्ज, ESC, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, थ्री-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम यासारखे सेफ्टी फीचर्स देखील आहेत.
टाटा पंच
नवीन GNCAP टेस्ट पॅरामीटर्समध्ये टाटा पंचने प्रौढ व्यक्तींच्या सेफ्टीसाठी 5 स्टार गुण मिळवले आहेत, तर कारने चाईल्ड सेफ्टीसाठी 4 स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. कारने प्रौढांच्या सेफ्टीसाठी 16.45/17 आणि चाईल्ड सेफ्टीसा 40.89/49 गुण दिले आहेत.
Mahindra XUV300
XUV 300 ने प्रौढ व्यक्तींच्या सेफ्टीसाठी 17 पैकी 16.42 गुण मिळवले, तर चाईल्ड सेफ्टीसाठी 49 पैकी 37.44 गुण मिळाले. याचा अर्थ या कारला प्रौढ व्यक्तींच्या सेफ्टीसाठी 5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि चाईल्ड सेफ्टीसाठी 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
टाटा अल्ट्रोझ
अल्ट्रोझने प्रौढ व्यक्तींच्या सेफ्टीसाठी 5 स्टार रेटिंगसह 16.3/17 गुण मिळविले आहेत, तर चाईल्ड सेफ्टीसाठी 3 स्टार रेटिंगसह 29/49 गुण मिळविले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने इतकी चांगली परफॉर्मन्स असणारी ही एकमेव हॅचबॅक कार आहे.
Mahindra XUV700
महिंद्राच्या XUV 700 ला ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ व्यक्तींच्या सेफ्टीसाठी (16.03/17) गुणांसह 5 स्टार रेटिंग आणि (41.66/49) चाईल्ड सेफ्टीसाठी 3 स्टार रेटिंग प्राप्त केलीआहे. त्याचे बॉडीशेल आणि फूटवेल अत्यंत मजबूत असल्याचे आढळले. तसेच, ड्युअल फ्रंटल एअरबॅग्ज, EBD सह ABS, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, 7 एअरबॅग्ज, ESP, 360-डिग्री कॅमेरा, लेन-कीपिंग असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ADAS सारखी फीचर्स देखील या कारमध्ये उपलब्ध आहेत.
टाटा नेक्सन
Nexon ने प्रौढ व्यक्तींच्या सेफ्टीसाठी 16.06/17 गुणांसह 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहे आणि चाईल्ड सेफ्टीसाठी 3 स्टार रेटिंगसह 25/49 गुण मिळवले आहेत. यापूर्वीही ही सर्वात सुरक्षित कार मानली जात होती. जुन्या मानकांमध्ये त्याला 5-स्टार रेटिंग होते.
महिंद्रा स्कॉर्पिओ एन
महिंद्राच्या नवीन SUV Scorpio-N ने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ व्यक्तींच्या सेफ्टीसाठी 29.25/34 गुणांसह 5 स्टार आणि चाईल्ड सेफ्टीसाठी 28.93/49 गुणांसह 3 स्टार मिळवले आहेत. कारला बॉडीशेल इंटिग्रिटीसाठी स्थिर रेटिंग देण्यात आली होती, ज्यामुळे ती सर्वात सुरक्षित बॉडी-ऑन-फ्रेम एसयूव्ही बनते. यासोबतच 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 4 डिस्क ब्रेक्स, EBD सह ABS, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, हिल होल्ड असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यासारखी सेफ्टी फीचर्स देखील उपलब्ध आहेत.