एक्स्प्लोर

मराठा समाजातील आमदार सोशल मीडियावर होतायेत ट्रोल? कारण...

मराठा समाजातील तरुणांनी मराठा आमदारांना मराठा आरक्षणासाठी सोशल मीडियातून प्रश्नाचा भडीमार करत ट्रोल केलंय. सर्वपक्षीय मराठा आमदारांना तरुणाईने धारेवर धरलंय.

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाजातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आमदार सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राजीनामे देणारे आमदार आहेत कुठे? कुणबी, ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळत नाहीत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. आता राज्यातील मराठा आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का? असा प्रश्न मराठा आमदारांना विचारला जातोय.

मराठा समाजातील तरुणांची मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर सोशल मीडियावर अस्वस्थता व्यक्त होतेय. वर्ष 2020-21 मध्ये होणारी सरकारी नोकर भरती किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा अंतरिम निकाल देत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.अंतिम निर्णयासाठी खटला मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येईल का, याचा निकाल आता मोठ्या खंडपीठासमोर लागेल. त्यामुळे मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे आणि तो सोशल मीडियावर व्यक्त होतोय.

मराठा समाजातील युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार घेतले 'हे' निर्णय

मराठा समाजातील तरुणांनी मराठा आमदारांना मराठा आरक्षणासाठी सोशल मीडियातून प्रश्नाचा भडीमार करत ट्रोल केलंय. सर्वपक्षीय मराठा आमदारांना तरुणाईने धारेवर धरलंय. निवडणुकीच्या तोंडावर दोन-चार डझन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामे दिले. मग एखादा आमदार मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर राजीनामा का देत नाही? असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातोय.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बदलण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावं यासाठी अनेक आमदारांनी राजीनामे दिले. यात केवळ मराठाच नाही तर अब्दुल सत्तार, रमेश कदम या बिगर मराठा आमदारांनीही राजीनामा दिल्याची घोषणा केली. प्रत्यक्ष नियमानुसार राजीनामे देणारे बोटावर मोजण्याएवढेच होते. पण आज याची आठवण मराठा समाजातील तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा आमदारांना करून देत आहेत. यात खासकरून कुणबी, ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळत नाहीत म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला, आता राज्यातील मराठा आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का? असा प्रश्न मराठा आमदारांना विचारला जातोय.

कोल्हापुरातील मराठा समाज गोलमेज परिषदेत 15 ठराव!

मराठा मोर्चा आंदोलकांनी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा आणि सोशल मीडियावर व्यक्त होणारी तरुणाई या पार्श्वभूमीवर आमदारांच्या घरासमोर पोलिसांचं संरक्षण आहे. सोशल मीडिया हे प्रत्येक व्यक्तीसाठी व्यक्त होण्याचं मोठं साधन झालंय. त्यामुळे मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने अस्थिर झालेला मराठा तरुण सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतांना दिसतो आहे. त्यामुळे यापुढेही मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आमदार ट्रोल होणार हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Sanjay Shirsat: मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
Nashik TCS Case News: बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश
बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Embed widget