(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर इम्तियाज जलील यांची टीका
अयोध्या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असंही इम्तियाज जलील म्हणाले.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे इव्हेंट आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, भाजप-शिवसेना युतीसाठी ही नौटंकी सुरु असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली.
शिवसेना-भाजपने सत्तेत असून गेली चार वर्षे एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र आता निवडणुका तोंडावर आल्याने एकत्र कसे यायचे त्यासाठी हा अयोध्या इव्हेंट होत आहे. अयोध्या दौऱ्यात सभा होणार नव्हती, तर मग महाराष्ट्रातून एवढे शिवसैनिक का घेऊन गेले? असा सवाल जलील यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या इतर नेत्यांना विचारला.
अयोध्या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असंही इम्तियाज जलील म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस
अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सकाळी नऊ वाजता राम जन्मभूमीत रामललांचं दर्शन घेतील. दुपारी 12 वाजता पत्रकारांशी तर एक वाजता जनतेशी हिंदी भाषेत संवाद साधतील. काल उद्धव ठाकरे यांनी राममंदिर उभारण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राममंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा, अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीहून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. या पूजेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद केला. आता हिंदू वाट बघणार नाही, तो प्रश्न विचारणारच असे सांगत संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठीशी राहिल मात्र राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा असे ठाकरे म्हणाले. अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही असे सांगत पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, आता वारंवार येत राहणार असेही ते म्हणाले.
काल शरयू नदीच्या तिरावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन केले आहे.रला दिलं.
संबंधित बातम्या
राममंदिर कधी उभारणार? तारीख सांगा, उध्दव ठाकरेंचं सरकारला अल्टिमेटम