Prashant Bamb Vs Teachers: आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांच्या वादावर अखेर सरकारने भूमिका मांडली
Deepak Kesarkar: शेवटी विद्यार्थींची गुणवत्ता याला सर्वाधिक प्राधान्य असून, ते कधीही आम्ही कमी होऊ देणार नाही; दीपक केसरकर
Aurangabad News : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शिक्षक आणि आमदार प्रशांत बंब यांच्या वादावर अखेर सरकारने आपली भूमिका मांडली आहे. यावर बोलतांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सर्वसाधारणपणे दुर्गम भागामध्ये शिक्षकांनी मुख्यालयी राहणे अपेक्षीत आहे. तसेच जे शिक्षक जवळ राहत असतील किंवा ते वाहन वापरत असतील असे सर्व मुद्दे तपासून घेतले पाहिजे. पण एका टोकाला जाऊन दोन्ही बाजूने अडून धरणे योग्य होणार नाही असे मला वाटते. प्रशांत बंब यांनी केलेलं आरोप आणि इतर सर्वे मुद्दे तपासून बघितले जातील. त्यामुळे यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. शिक्षक संघटनांसोबत याबाबत चर्चा करावी लागेल. शेवटी विद्यार्थींची गुणवत्ता याला सर्वाधिक प्राधान्य असून, ते कधीही आम्ही कमी होऊ देणार नाही,असे केसरकर म्हणाले.
मुख्यालयीच्या ठिकाणी राहण्याची अट रद्द करा अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना केसरकर म्हणाले की, आज तरी अट रद्द झालेली नाही. त्यामुळे अशी मागणी करणे योग्य ठरणार नाही. मात्र चर्चेतून मार्गे निघतो, यासाठी शिक्षकांसोबत चर्चा करून यावर मार्ग काढू असेही केसरकर म्हणाले.
आमच्या दृष्टीने हिंदुहृदयसम्राट फक्त बाळासाहेबचं...
नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट म्हणून केल्याचा प्रश्नाला उत्तर देतांना दीपक केसरकर म्हणाले की, आमच्या दृष्टीने किंवा महराष्ट्राच्या दृष्टीने हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहे. त्यांना जनतेने दिलेले पद आहे. आम्ही त्यांचा आदर करतो आणि बाळासाहेब ठाकरे यांची ओळखच हिंदुहृदयसम्राट म्हणून आहे. बाळासाहेब ठाकरेंचीच शिवसेना म्हणजे आमचीच शिवसेना आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने लोकं जमतायत.
गोमूत्र घालण्याएवढेच शिवसैनिक शिल्लक राहिले...
मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी बिडकीन येथे काढलेल्या रॅलीच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचं शुध्दीकरण केलं. यावर बोलतांना केसरकर म्हणाले की, बिडकीन गावातील हजारो लोकांनी रस्त्यावर येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं स्वागत केले. मात्र एकनाथ शिंदे तेथून गेल्यावर काही लोकांनी गोमूत्राने सफाई केली. त्यामुळे त्या गावात आता फक्त गोमूत्र घालण्याएवढेच कार्यकर्ते शिल्लक राहिले असावेत, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या...
CM Eknath Shinde: 'या' दहा कारणांमुळे गाजला मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI