Aurangabad:काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच सुरु होता अड्डा
Aurangabad Crime News: काँग्रेसचा माजी नगरसेवक अफसर खान याच्या लक्की स्टार या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी छापा टाकला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. विशेष म्हणजे हा जुगार अड्डा काँग्रेसचा माजी नगरसेवक (EX Congress Corporator) चालवत असल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण 57 जणांना पकडले असून, त्यांच्या ताब्यातून एकूण 2 लाख 2 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काँग्रेसचा माजी नगरसेवक अफसर खान याच्या लक्की स्टार या पत्त्याच्या क्लबवर मंगळवारी रात्री पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने धाड मारली. यात सुमारे 35 जुगारी आणि 14 कर्मचारी व इतर असे एकूण 57 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. तर याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस आयुक्तालयापासून अगदी पाचशे मीटर अंतरावर अनेक वर्षांपासून एक जुगार अड्डा सुरु आहे. यापूर्वीदेखील या जुगार अड्यावर धाड मारण्यात आली होती. मात्र आता पुन्हा हा अड्डा सुरु झाला असून, लपूनछपून चालणारा हा अड्डा गेल्या काही महिन्यांपासून उघडपणे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
कारवाईनंतर तरुणांचा जमाव
पोलिसांनी माहिती होताच मंगळवारी रात्री सिटी चौक पोलिसांनी सापळा रचून अड्ड्यावर धाड मारली. यात सुमारे जुगाऱ्यांसह 49 जणांना ताब्यात घेण्यात आले. धाडीनंतर अचानक जुगार अड्डा परिसरात तरुणांचा जमाव जमा झाल्याने पोलिसांची कुमक मागवून बंदोबस्त लावण्यात आला होता. याप्रकरणी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती. तर या कारवाईसाठी गुन्हे शाखा, आयुक्तांच्या विशेष पथकासह सिटी चौक पोलीसह एकूण 70 जणांचे पथक घटनास्थळी होते.
यापूर्वी निलंबित पोलीस कर्मचारी चालवत होता अड्डा...
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने याच परिसरात एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. विशेष म्हणजे हा अड्डा खुद्द एक निलंबित पोलीस कर्मचारी चालवत होता. विशेष म्हणजे तो जुगार अड्डा सुद्धा पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाजूलाच सुरु होता. त्यामुळे जुगार अड्डे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात चालवण्याची हिम्मत होतीच कशी आणि वेळीच पोलिसांना याची माहिती मिळत कशी नाही असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad Crime: आधी तरुणाला संपवलं, त्यानंतर हातपाय बांधून विहिरीत फेकलं; परिसरात खळबळ
धक्कादायक! चक्क निलंबित पोलीस कर्मचारीच चालवायचा जुगार अड्डा, महिलेसह 32 जण ताब्यात