एक्स्प्लोर
Advertisement
ललिताचा ललित कुमार झालेला तरुण विवाहबद्ध; औरंगाबादमध्ये छोटेखानी कार्यक्रमात लग्न
अनेक दिवसांच्या संघर्षानंतर ललिताचा ललित कुमार झालेल्या तरुण विवाहबद्ध झालाय. औरंगाबादमध्ये छोटेखानी कार्यक्रमात त्याने लग्न केलं.
औरंगाबाद : अनेक अडचणींमधून ललिताचा ललित कुमार झालेला तरुण विवाहबद्ध झालाय. औरंगाबादला मुलगी बघण्यासाठी गेलेल्या ललितने छोटेखानी कार्यक्रमामध्ये लग्न केलं. माजलगाव तालुक्यातल्या राजेगाव येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ललिता 2010 मध्ये महिला कर्मचारी म्हणून पोलीस खात्यात रुजु झाली. मात्र, शरीरातील बदलानंतर ललिता लिंगबदल शस्त्रक्रिया करुन ललित कुमार झाली. यामुळे त्याच्या पोलिसातील नोकरीवर गदा आल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ललितच्या शरीरात लहानपणापासूनच मुलांचे हार्मोन्स होते. परंतु, त्याच्या लैंगिक अवयवाची वाढ झाली नसल्याने आई-वडिलांनी त्याचा मुलगी म्हणून सांभाळ केला. वर्षभरापूर्वी शरीरात काही बदल जाणवू लागल्याने आपण पुरुष असल्याचा भास त्याला झाला आणि त्यांनी मुंबई येथील डॉक्टरकडे तपासणी केली असता लिंगबदल शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. हा सल्ला स्वीकारणे एवढं सोपं नव्हतं. कारण महिला म्हणून नोकरीला लागलेल्या ललिता समोर शस्त्रक्रियेनंतर नोकरीत कायम ठेवण्यासाठीचा मोठा संघर्ष होता. बऱ्याच संघर्षानंतर ललिताला प्रशासनाने परवानगी दिली. ललितावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
ललित कुमार सध्या माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करतो. ललिताचा ललित कुमार झाल्यानंतर आता ललित कुमार विवाहबद्ध झालाय. औरंगाबादला मुलगी बघण्यासाठी गेलेल्या ललित छोटेखानी कार्यक्रमामध्ये लग्न करूनच माजलगावला परतला.
अखेर ललिता साळवेला लिंगबदल शस्त्रक्रियेला परवानगी
ललितचा संघर्ष -
बीड पोलीस दलातील महिला शिपाई ललिता साळवेला लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी खूप संघर्ष करावा लागला. बीड पोलीस दलात 2010 मध्ये भरती झालेल्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेने, पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे लिंगबदल करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. ललिता पोलीस दलात महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली खरी पण, त्यांनतर शरीरात महिलेपेक्षा वेगळे बदल तिला जाणवू लागले. त्यामुळे तिने जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना सप्टेंबर 2017 मध्ये अर्ज करुन, आपणास पुरुष होण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज केला.
मात्र, हा विषय जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने त्यांनी ललिताचा अर्ज राज्याचे पोलिस महासंचालकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला होता. पण पोलिस महासंचालकांनी लिंग बदल करुन पोलिस दलातील नोकरी कायम ठेवण्याची तिची मागणी फेटाळली होती. तर मुख्यमंत्र्यांनी या दुर्मिळ केससंदर्भात सहानुभूतीने विचार व्हावा, असा आदेश दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनंतर गृहखात्याने याप्रकरणी कायदेशीर मतं मागवली. ललिता साळवे शरीरातील जैविक बदलांशी सामना करत आहे. ही नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगला जाणं आवश्यक आहे. विशेष केस म्हणून तिच्या मागणीला परवानगी दिली जात आहे. त्यामुळे लिंगबदलानंतरही ललिता पुढील काळात नोकरीत कायम राहू शकेल, अशा आशयाचं पत्र पोलिस अधीक्षकांनी दिलं.
बीड : लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलिसात रुजू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement