एक्स्प्लोर
हिंदू संताचा दर्गा, येथे भजनासोबत कव्वालीदेखील गायली जाते
दर्ग्यांमध्ये दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी अनेक हिंदू जातात. परंतु हिंदूंचा दर्गा कधी पाहिला आहे का? औरंगाबादमध्ये असा एक हिंदू संतांचा दर्गा आहे.
औरंगाबाद : दर्ग्यांमध्ये दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी अनेक हिंदू जातात. परंतु हिंदूंचा दर्गा कधी पाहिला आहे का? औरंगाबादमध्ये असा एक हिंदू संतांचा दर्गा आहे. चांद बोधले दर्गा म्हणून या दर्ग्याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या तेराव्या उपवासाला या दर्ग्यात भजनांसोबत कव्वालीदेखील गायली जाते. त्यामुळेच हा दर्गा हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानला जातो.
देवगिरी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच्या बाजूस शाही हमामच्या मागे चांद बोधले यांचा दर्गा आहे. चांद बोधले यांचे शिष्य संत जनार्दन स्वामी यांनी हा दर्गा बांधला आहे. चांद बोधले यांनी सुफी संप्रदाय स्वीकारला होता. त्यामुळे त्यांची समाधी म्हणजे दर्गा समजला जातो.
इतर दर्ग्यांमधील मजार जमिनीच्या समांतर असतात, परंतु या दर्ग्याची मजार ही जमिनीपासून उंचावर आहे. मजारकडे जाताना काही पायऱ्या चढून जावं लागतं. असे म्हटले जाते की, मोठ्या संतांच्या मजार उंचावर असतात.
समाधीचे तीन कमानींचे भक्कम बांधकाम आहे. या कमानींचे खांब कर्नाटकमधील बेलूर हळेबिडू हिंदू मंदिरातील खांबांसारखे आहेत. बाजूच्या जिन्यावर पानाफुलांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. समाधी मंदिर हिंदू परंपरेप्रमाणे पूर्वेला तोंड करुन आहे. या समाधीवर कायमस्वरूपी दिवा तेवत ठेवलेला असतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement