Navneet Rana : खासदार नवनीत राणा शेतकऱ्यांच्या बांधावर, पेरणीपूर्व तयारीचा घेतला आढावा
Navneet Rana : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मशागत, पेरणी पूर्व तयारीचा आढावा घेतला.
Navneet Rana : अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मशागत, पेरणी पूर्व तयारीचा आढावा घेतला. नवनीत राणा यांनी मोर्शी (Morshi) तालुक्यातील पातूर येथील शेतकरी किरण फरतोडे यांच्या शेतात जाऊन स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतीची मशागत केली. यावर्षी पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हावा अशी प्रार्थनाही राणा यांनी केली. मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेती कामाला वेग आला आहे.
शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवणार
मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे. या पेरणी पूर्व तयारीचा शेतात जावून खासदार नवनीत राणा यांनी आढावा घेतला. यावर्षी पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हावा अशी प्रार्थना राणा यांनी केली. शेतकऱ्यांना काही अडी अडचणी असल्यास त्या सोडवणार असल्याचे राणा म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्बात केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिले.