EI Nino 2023: राज्यावर ‘अल निनो’चं संकट?; सरकारकडून समिती स्थापन; फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
EI Nino 2023: अल निनो (EI Nino) च्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
EI Nino 2023: दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल निनो (EI Nino) या समुद्री प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जून 2023 नंतरही पिण्यासाठी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान यावरच बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल निनो सारख्या परिस्थितीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आपल्याकडे मेट्रोलॉजिकल विभागाचा अंतिम अहवाल 21 एप्रिल नंतर येतो. तो आल्यावर त्यानुसार पावले उचलली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
हे वर्ष (2023) ‘अल निनो’चे असू शकते, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर हवामानतज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान यावर बोलताना फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना, 'अल निनो’च्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचं म्हटले आहे. तसेच अल निनो सारख्या परिस्थितीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. मेट्रोलॉजिकल विभागाचा अंतिम अहवाल 21 एप्रिल नंतर येणार असून, तो आल्यावर त्यानुसार पावले उचलली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात 7 हजार 400 हेक्टरवरील पिकांचं अवकाळीमुळे नुकसान
दरम्यान फडणवीस यांनी आज (10 एप्रिल) रोजी अमरावती विभागाच्या अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाई आढावा घेतला. ज्यात 242 गावातील 7 हजार 400 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, यात 7 हजार 596 शेतकरी बाधित झाले असल्याच फडणवीस म्हणाले. तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे उद्यापर्यंत पूर्ण केले जाईल. लवकरच या शेतकऱ्यांना शासन मदत करत आहे. तर जुने पंचनामे पूर्ण झाले असून, त्या शेतकऱ्यांना पात्र केले गेले असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच राज्यातील शेती नुकसानीचे प्राथमिक अंदाज आमच्याकडे आले आहेत, अंतिम अंदाज आल्यानंतर मदत जाहीर करण्यात येईल. तर 7 हजार 400 हेक्टरवरील पिकांचं अवकाळीमुळे नुकसान झाले असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
टेक्स्टाईल पार्कसाठी 15 दिवसांत जमीन अधिग्रहण
अमरावती जिल्ह्यातील प्रस्तावित टेक्स्टाईल पार्क केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांत टेक्स्टाईल पार्कसाठी लागणारी जमीन अधिग्रहित केले जाईल. तसेच शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला जाणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारसोबत एमओयू करून लवकरच पायभूत सुविधांचे कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Unseasonal Rain : मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; संभाजीनगर, बीडसह हिंगीलो जिल्ह्याला मोठा फटका