Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
Punha Shivajiraje Bhosale : पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली.

Punha Shivajiraje Bhosale मुंबई : महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थित पार पडला. आज लोअर परेल येथील पीव्हीआर मध्ये 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हा सिनेमा महाराष्ट्राचा आहे, यापूर्वीचा सिनेमा मुंबईचा होता असं म्हटलं. या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, असं देखील ते म्हणाले. आज या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. पुण्यात सुरू असलेल्या बैठकींमुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
हा सिनेमा महाराष्ट्र उचलून धरेल : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या पोशाखावर उपहासात्मक प्रतिक्रिया देत म्हटलं की एक काठीयवाडी माणूस मराठी चित्रपट बनवतो. महेश कोठारे यांना सांगायला हवे की झपाटलेला 2 काढा हा झपाटलेला माणूस आहे. महेश मांजरेकर आणि माझ्यात एक कॉमन गोष्ट आहे की आम्ही दोगेही जे पाहतो ते भव्य पाहतो. याधीचा चित्रपट हा मुंबई पुणे ठाणे साठी होता पण हा चित्रपट महाराष्ट्राचा आहे. चित्रपटातून हे मांडणे धाडस आहे. मी दरवेळी म्हणतो आणि मागेही म्हटले आहे हिंदीत यश चोप्रा आणि मराठी मध्ये महेश मांजरेकर आहेत. हा सिनेमा महाराष्ट्र उचलून धरेल, चित्रपट धरून ठेवेल,पण हा चित्रपट वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावर असलेला चित्रपट आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
महेश मांजरेकर म्हणाले की हा सिनेमा पार्ट २ नाही. मला शेतकरी आत्महत्या यावरील सिनेमावर काम करायचं होते. ज्या दोघांना घेऊन मी सिनेमा केला आहे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मी त्या दोघांना भेटायला बोलविले आणि मग सिनेमा करायचं ठरविलं, असं महेश मांजरेकर यांनी म्हटलं.
शेतकरी जवळजवळ रोजच आत्महत्या करत आहे. महाराष्ट्रात यंदाची परिस्थिती काय आहे हे पाहिले आहे. मराठी माणसाची परिस्थिती काय आहे ? आपल्या राज्यात आपलीच अवस्था काय ? आणि यावर महाराज काय रिएक्ट होणार या अनुषंगाने सिनेमा आहे, असं महेश मांजरेकर म्हणाले.
मी ठरविले आहे की आता मराठी सिनेमा करायचा आणि त्याला डब हिंदीत करायचं. आपण चांगले सिनेमे द्यायचे आणि मग बाकी सगळे डब करतील की असंही मांजरेकर म्हणाले. मी वाट पाहतोय की मराठी सिनेमा 450 कोटी कमवेल, असंही मांजरेकर म्हणाले. ट्रेलर लाँचनंतर संपूर्ण सिनेमातील कलाकारांचे राज ठाकरे आणि महेश माजरेकर यांच्यासोबत फोटोशूट पार पडलं.
























