(Source: ECI | ABP NEWS)
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
जिवंतपणी मृत असल्याचे भासवून त्यांनी आपल्या अंत्यसंस्काराला कोण येते हे पाहण्यासाठी हा अनोखा प्रयोग केला. त्यांच्या या प्रतीकात्मक अंत्ययात्रेला शेकडो लोक उपस्थित राहिले.

Living Man Organizes Own Funeral: जिवंत असताना किती सोबत आहेत हा आभासी जीवनातील संशोधनाचा भाग झाला असला, तरी मृत्यूनंतर किती गोळा होतील याची सुद्धा शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर किती लोक गोळा होतील हे पाहण्यासाठी एका माजी हवाई दलाच्या सैनिकाने केलेल्या प्रकाराने अवघ्या राज्यात चर्चा रंगली आहे. त्यांच्या मृत्युनंतर किती लोक उपस्थित राहतील हे जाणून घेण्यासाठी स्वतःची अंत्ययात्रा आयोजित केली. बिहारमधील गयाजी येथील 74 वर्षीय मोहन लाल यांनी जिवंतपणी मृत असल्याचे भासवले. त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था जणू ते मृत असल्यासारखे केली. अंत्ययात्रेत शेकडो लोक उपस्थित होते. अंत्ययात्रा एक भव्य कार्यक्रम होता, बँड वाजवत होता आणि "राम नाम सत्य है" च्या जयघोषाने मिरवणूक काढण्यात आली. "चल उड जा रे पंछी, अब देश हुआ बेगाना" चे संगीत देखील साउंड सिस्टमवर वाजत होते. गावकऱ्यांनी मोहन लाल यांची फुलांनी सजवलेली मिरवणूक स्मशानभूमीत नेली. स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर, एक प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. त्यानंतर सामूहिक मेजवानी आयोजित करण्यात आली. या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
"मला माझी स्वतःची अंत्ययात्रा पहायची होती" (Symbolic Cremation Bihar)
मोहन लाल हे गयाजी जिल्ह्यातील गुरारू ब्लॉकमधील कोंचा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी हवाई दलात वॉरंट ऑफिसर म्हणून काम केले. त्यांनी स्पष्ट केले की त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराला कोण उपस्थित राहते ते पहायचे होते. ते पुढे म्हणाले, "लोक मृत्युनंतर पार्थिव नेतात, पण मला हे दृश्य स्वतः पहायचे होते आणि माझ्या मृत्यूनंतर लोक मला किती आदर आणि प्रेम दाखवतात ते पहायचे होते." मोहन लाल म्हणाले, "हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर, देशाची सेवा केल्यानंतर माझ्या गावाची आणि समाजाची सेवा करण्याची माझी मनापासून इच्छा होती. माझ्या गावात, पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे खूप कठीण होते. हे पाहून मला स्मशानभूमी बांधण्याची इच्छा झाली." मी स्मशानभूमी बांधली. उद्घाटनादरम्यान, मी स्वतः माझ्या अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. माझ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या लोकांना पाहून मला खूप आनंद झाला.
मुले डॉक्टर आणि शिक्षक आहेत (Emotional Bihar Viral News)
मोहन लाल यांना दोन मुले आहेत. एक कलकत्त्यात डॉक्टर आहे आणि दुसरा शिक्षिक आहे. त्यांना एक मुलगी आहे जी धनबादमध्ये राहते. मोहन लाल यांची पत्नी हयात नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
























