Unseasonal Rain : मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; संभाजीनगर, बीडसह हिंगोली जिल्ह्याला मोठा फटका
Marathwada Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा मोठा फटका मराठवाड्याला बसताना पाहायला मिळत आहे.
Marathwada Unseasonal Rain: गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. रविवारीही काही भागांत वादळी पावसासह गारपीट झाली असून, उभे पीक आडवे झाल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), हिंगोली (Hingoli) आणि बीड जिल्ह्यात (Beed District) गारांचा पाऊस झाला आहे. तर आज चौथ्या दिवशी सकाळीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा मोठा फटका मराठवाड्याला बसताना पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेहूर तसेच निपाणी परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास गारांचा तुफान पाऊस झाला. परिसरात पहिल्यांदाच असा गारांचा पाऊस झाल्याचे शेतकरी सांगतायत. तर या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. हा गारांचा पाऊस इतका जोरदार होता की, जेहुर परीसरात अक्षरशः कांदयाच्या शेतात गारांचा खच पडला होता. तर गारांचा पाऊस झाल्याने कांदा, गहु, अद्रक, तमाटा, बटाटा, बाजरी इत्यादी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यावेळी गारपीटही झाली. यामुळे फळबागांसह गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तर गारपिटीमुळे फळबागाला लागलेल्या कैऱ्या पडल्या आहेत. दरम्यान, बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा, केज तालुक्यांत शनिवारी अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला होता.
हिंगोली : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. तर याच अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा फटका हिंगीली जिल्ह्याला देखील फटका बसला आहे. तर जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे रविवारी (9 एप्रिल) रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. जवळपास बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत.
परभणी: जिल्ह्यात रविवारीही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर, परभणी तालुक्यातील दैठणा, गंगाखेड तालुक्यातील खळी, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव, मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात अव्काळीने पावसाने हजेरी लावली. तर निलंगा तालुक्यातील चिलवंतवाडीतील एका घरावर शुक्रवारी मध्यरात्री वीज कोसळली. त्यात स्लॅब व भिंतींना तडे गेले. शिवाय, घरातील सर्व विद्युत नावणेसहा वाजेदरम्यान वादळी उपकरणे जळाली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
अवकाळी पाऊस! संभाजीनगर जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाला सुरुवात, शेतकरी हवालदिल