एक्स्प्लोर

एक दोन जण मेले तरी चालतील पण कबुतर जगली पाहिजेत म्हणणारे जैन मुनी अहिंसावादी आहेत ना? आता लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल

मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी जैन मुनींच्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रहार करत मुंबईवरील पहिला अधिकार मराठी माणसाचा असल्याचे स्पष्ट केले. मुंबई मराठी माणसाची असल्याचा ठाम दावा केला.

jain Muni Political Remark: मुंबईवर हक्क सांगायचा हाच प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे बोलून दाखवत होते. राज ठाकरे यांचे विधान अखेर खरं ठरलं असून मुंबईवर हक्क सांगायचं त्यांचा आता प्रयत्न दिसत आहे, आता तरी मराठी माणसाने जाग व्हावं, असे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं आहे. जैन मुनींनी कबुतराला राजकीय पक्षाची घोषणा केली आहे, ही घोषणा करताना बेताल वक्तव्ये सुद्धा करण्यात आली. यानंतर आता मनसेकडून जैन मुनींच्या राजकीय भाषेवर मनसेकडूनही जोरदार प्रहार करण्यात आला. कबूतर आणून द्यायचं आमचं काम नाही, तर जाळ्या काढणं तुमचं काम आहे. सगळ्या जाळ्या काढा आणि कबूतर येतात का पहा. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असा प्रकार आहे. माझ्या घरात चालणार नाही पण दुसऱ्यांच्या घरात केलं पाहिजे, भले जीव गेला तरी चालेल हे कसं काय मान्य करायचं? हे मुनी आहेत आणि अहिंसावादी आहेत ना? मुंबईचा महापौर आम्ही ठरवू, टॅक्स वगैरे आम्ही भरतो, यावर काय उत्तर द्यावं वाटतं नसल्याचे ते म्हणाले. 

मुंबईवरील पहिला अधिकार मराठी माणसाचा (Avinash Abhyankar on Jain Munis)

अविनाश अभ्यंकर म्हणाले की, मराठी माणूस हा आपल्या राज्यात उत्तम काम करतो, कर्ज घेऊन पळून जात नाही. आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो असं बोलून मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रयत्न आहे. मुंबई ही 107 हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईवरील पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे, पहिले संस्कार मराठी आहेत, त्यामुळे मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबई ही महाराष्ट्रापासून कशी तोडता येईल, अन्यथा आपले राज्य कसे स्थापन करता येईल हा त्यांचा प्रयास असल्याचा हल्लाबोल अभ्यंकर यांनी केला. ते म्हणाले की, लोढा आता कुठे आहेत? त्याबद्दल कुठलंही भाष्य करत नाहीत. कबुतरांसाठी ते जागा शोधत आहेत का? अहिंसावादींना दिशा दाखवणारी माणसं आहात गायब होऊन चालेल का? त्यांनी लोकांचं प्रबोधन करायचं असतं. अशी वक्तव्य शोभत नाहीत. जास्तीत जास्त लोक प्रबोधनात कसे येतील याकडे त्यांनी पहावं. अहिंसा शिकवणारी माणसं शस्त्र हातात घ्यायची बाता करत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याचे ते म्हणाले. 

लोढा यांचं काय म्हणणं आहे? (Avinash Abhyankar on Lodha)

मनुष्य प्राणी हा जगला तर इतर प्राणी पक्षी जगतील, निसर्गाने सर्व प्राणी पक्षांची रायची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे.  माणूस मेला तरी चालेल पण कबुतर जगली पाहिजे असं ते म्हणाले होते. त्यावर काय भाष्य करणार? त्यांना शोभते का?  यावर मुख्यमंत्री यांचे काय म्हणणे आहे? लोढा यांचं काय म्हणणं आहे? अशी विचारणा त्यांनी केली. 

त्यांचे डॉक्टर जे असतील त्यांच्याशी चर्चा करावी (Jain Monk Political Remark) 

कबुतरामुळे आणि त्यांच्या विष्टेमुळे अनेक प्रकारचे आजार होतात, कदाचित एखादी व्यक्ती मृत्यूची पडू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जे डॉक्टर प्रतिक्रिया देतात ते मूर्ख आहेत असे या मुनींचे म्हणणं आहे. त्यांच्या बुद्धीची मला आता कीव करावीशी वाटते. सगळे डॉक्टर बाजूला काढा,  त्यांचे डॉक्टर जे असतील त्यांच्याशी चर्चा करावी. तुम्ही सायन्सला चॅलेंज करायला जाऊ नका कारण धर्म एका ठिकाणी असतो आणि विद्वान एक ठिकाणी असतो, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
Embed widget