एक्स्प्लोर

तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल

Harish Pimple Viral Audio Call : मुर्तिजापूर शहरातील एका वॉट्सअॅप गृपवरील चॅटिंगवरून वाद झाल्यानंतर भाजप आमदाराने संबंधित व्यक्तीला धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय. 

अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीष पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमधील मोबाईल संवादाची ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होत आहे. मुर्तिजापूर शहरातील एका वॉट्सअॅप गृपवरील चॅटिंगवरून हा वाद झाल्याचं बोललं जातंय. अर्जुन लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याचं बोललं जातंय. 

अर्जुन लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानेच त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितलं. तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारावरून जाब विचारल्यानेच आमदार पिंपळेंनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीनं केला आहे. पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र काहीही झाले तरी आपण माफी मागणार नसल्याचं अर्जुन लोणारे यांनी स्पष्ट केलंय. 

आमदार हरीष पिंपळे आणि अर्जुन लोणारे यांच्यातील संवाद... 

लोणारे : हा बोला! 
आमदार पिंपळे : तू वारकरी भक्त आहेस. तू 'मल' म्हणजे 'X' खाऊ लागले म्हणतो मोदींचा. मग तू का राहुल गांधीचा खाऊ लागला का मग?. 
लोणारे : मी कुणाचं नाव नाही घेतलं भाऊ. 
आमदार पिंपळे : पण आता तू... हे पहा तुले आता आखरी इंटीमेशन देऊ लागले. तू चांगला वारकरी आहे. गजानन महाराजांचा भक्त आहे म्हणून मी तुले काही करू नाही लागलो. तू आम्हाले 'मल' म्हणजे आम्हाले X खाणारा समजू लागला का?. 
लोणारे : पण मी कुणाचं नाव नाही घेतलं ना भाऊ. 
आमदार पिंपळे : नाव नाही घेतलं म्हणजे कुणाचं नाव घेऊ लागला रे तू. मोदीभक्त म्हणजे कोण आहे रे? मोदीभक्त म्हणजे कोण आहे? 
लोणारे : जो असेल त्याले लागल. 
आमदार पिंपळे : म्हणजे मग मोदी भक्त आहे. मग तू राहूल गांधीचा भक्त आहे का? तू तर लेका वारकरी आहेस ना. मग ते 'मल' शब्द का लिहिला. तू अंधभक्त लिही ना. तू मल कायले लिहिलं. 'मल' म्हणजे X खाणारे दिसू लागलो की तुले आम्ही. 
लोणारे : तुमचं नाव घेतलेलं नाही आहे. 
आमदार पिंपळे : बरं तू थांब आता. तुले आखरीचं सांगू लागलो मी. तू असं वाईट लिहू नको. तू गजानन भक्त आहे म्हणून मी तुले वारंवार सांगू लागलो. 
लोणारे : मी वाईट नाही लिहू लागलो. 
आमदार पिंपळे : 'मल' म्हणजे X. मग तू राहूल गांधींचा खा़ऊ लागला का?
लोणारे : मी कोणाचाच नाही खाऊ लागलो. तुमचं नाव लिहिलं का? 
आमदार पिंपळे : बरं ठिक हाय ना. तुले आखरी इंटीमेशन अहे. तु आता हे फक्त लिही. ते 'मल' फक्त तू काढू नको आता. मग तू पाय फक्त आता.
लोणारे : मी तुमचा शब्द काढून टाकू लागलो. तुम्ही काही बोलू लागलो का मी. 
आमदार पिंपळे : 'मल' शब्द ठेवला ना तू. तू "मल' शब्द काढू नको आता, मग पाय तू. 
लोणारे : अरे बाबा मी तुम्हाला काही बोललोच नाही. तुमचं नाव तरी आहे का त्याच्यात. 
आमदार पिंपळे : तू 'मल' शब्द लिहिला ना. मोदीभक्त आहो आम्ही. मी मोदीभक्त आहो. मग मी की X खाऊ लागलो का?
लोणारे : तुम्ही कशाला लावून घेता मनाला. 
आमदार पिंपळे : मी सांगू लागलो मी मोदीभक्त आहो. तू ते लिहिलं ना. तू ते काढतो का अता मार खातोस. 
लोणारे : मी तुमचं नाव घेतलं का?. 
आमदार पिंपळे : तुले माणुसकीने सांगू लागलो. तु गजाननभक्त आहेस. शिल्लकचे कामं करू नकोस. तुले कोणत्या पक्षाचं घेणदेणं नाही आहे. 
लोणारे : मले कोण्या पक्षाचं देणंघेणं नाही. 
आमदार पिंपळे : तु का आमाले X खाणारे म्हणत असशील तर तुया तोंडात का घातला नाही तर नावाचा आमदारच नाही. 
लोणारे : हो, ठिक आहे. ठिक आहे. काही हरकत नाही. 
आमदार पिंपळे : कुठे आहे तू. 
लोणारे : अकोल्याला आहो सध्या. 
आमदार पिंपळे : मुर्तिजापूरले ये तू आता. 
लोणारे : ओके, ठिक आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Embed widget